Goa Chess Association Dainik Gomantak
गोवा

Goa Chess Association: ऋत्विज परब रॅपिड बुद्धिबळात विजेता; सर्वाधिक साडेआठ गुणांची कमाई

Goa Chess Association: अपराजित कामगिरी: मंदार लाड उपविजेता, भक्ती कुलकर्णी तिसरी

किशोर पेटकर

Goa Chess Association: इंटरनॅशनल मास्टर (आयएम) मंदार लाड याने नऊ फेऱ्यांत अपराजित राहत सर्वाधिक साडेआठ गुणांची कमाई केली आणि रोटरी क्लब ऑफ पर्वरीच्या खुल्या रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले.

मंदार लाड याला आठ गुणांसह उपविजेतेपद मिळाले, तर आयएम भक्ती कुलकर्णी साडेसात गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिली.

रवींद्र निकम, कार्तिक मुचंडी व मयुरेश देसाई यांचेही प्रत्येकी साडेसात गुण झाले. त्यांना टायब्रेकर गुणांत अनुक्रमे चौथा ते सहावा क्रमांक मिळाला.

आयएम नीतिश बेलुरकर, कनिष्क सावंत, रुबेन कुलासो, चैतन्य गावकर, ब्रेंडन पिरोझ, साईरुद्र नागवेकर, दत्ता कांबळी, आर्यन रायकर, सचिन गावडे यांना अनुक्रमे सात ते पंधराव्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. 40 वर्षांवरील गटात दिमित्री बेझस्त्राखोव व व्हॅल्लोन फर्नांडिस बक्षीसपात्र खेळाडू ठरले.

वयोगटात प्रयांक गावकर, इव्हान तेलिस, नारायण प्रभू, विहान तारी, आर्यन नाईक, रिशित गावस, शुभ बोरकर, विपुल कदम, आर्यव्रत नाईक देसाई, अनीश बोरकर, ह्रदय मोरजकर, सर्वांग पागी, अथर्व सावळ, साहिल शेट्टी, आयुष नाईक, त्रिशा पटेकर, वियोमी परब, शिवण्या राव, अवनी सावईकर, वनिया दुकळे, शिनेल रॉड्रिग्ज, सायला रॉड्रिग्ज, झुरिना व्हासार्हेली, दिया नाईक, वैष्णवी परब, नव्या नार्वेकर, सिद्धी नाईक, सय्यद माहदिया, साईमा गावकर व आर्वी नाईक यांना बक्षीस मिळाले.

स्पर्धा कुजिरा-बांबोळी येथील डॉ. के. ब. हेडगेवार हायस्कूलमध्ये तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने आणि गोवा बुद्धिबळ संघटना व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या मान्यतेने घेण्यात आली.

अशोक सप्रा, रोटरी क्लब पर्वरीचे अध्यक्ष उमेश नाईक, गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव आशेष केणी, संदीप भरणे, स्पर्धेचे मुख्य आर्बिटर अरविंद म्हामल, विवेक केरकर, डॉ. प्रमोद दाबाळे, रायन कॉस्ता, रवी गुप्ता यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोलीत दिवाळीची लगबग; गावठी पोहे, आकाशकंदिलांची रेलचेल, कारीटेही दाखल; मिठाईची दुकानेही सजली

Tragic Death: संसर्गामुळे हृदय, श्वसनक्रिया पडली बंद; मडगावात 14 वर्षीय मुलाचा मृत्यू

Rohit Sharma: वीरेंद्र सेहवागचा 'तो' ऐतिहासिक विक्रम धोक्यात! ऑस्ट्रेलियात 'हिटमॅन' रोहित शर्माकडे इतिहास रचण्याची संधी

Goa Live Updates: नायजेरियन व्यक्तीकडून अमलीपदार्थ जप्त

Mayem Lake: मये तलावाला लवकरच येणार 'अच्छे दिन', जोडरस्त्याच्या कामाचा प्रारंभ; नोव्हेंबरपासून पर्यटनाला चालना

SCROLL FOR NEXT