CK Nayudu Trophy Dainik Gomantak
गोवा

C. K. Nayudu Cricket: गोलंदाजांमुळे गोव्याला आघाडी

C. K. Nayudu Cricket: घसरगुंडीमुळे राजस्थान दहा धावांनी पिछाडीवर

किशोर पेटकर

C. K. Nayudu Cricket: राजस्थानचा 23 वर्षांखालील संघ कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट सामन्यात वर्चस्वाच्या दिशेने कूच करत असताना गोव्याच्या गोलंदाजांनी कमाल केली, त्यामुळे त्यांना दहा धावांची निसटती, पण महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली.

सांगे येथील जीसीए मैदानावर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी राजस्थानने अखेरच्या 7 विकेट 49 धावांत गमावल्या. त्यामुळे गोव्याच्या पहिल्या डावातील २१९ धावांना उत्तर देताना राजस्थानचा डाव 209 धावांत आटोपला.

त्यांची तीन बाद १६० वरून दाणादाण उडाली. गोव्यातर्फे लखमेश पावणे व राहुल मेहता यांनी प्रत्येकी तीन, तर शुभम तारी व सनिकेत पालकर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

गोव्याचा डाव पहिल्या दिवशीच्या ७ बाद २०२ धावांवरून सोमवारी सकाळी २१९ धावांत संपुष्टात आला. नंतर २ बाद १७ वरून राजस्थानला सावरताना अंशुल गढवाल (५४) व राज शर्मा (६०) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली.

नंतर राज व करण लांबा (४१) यांनी चौथ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केल्यानंतर राजस्थानचा डाव गडगडला.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव (७ बाद २०२ वरुन): १००.१ षटकांत सर्वबाद २१९ (सनिकेत पालकर १६, लखमेश पावणे १६, शुभम तारी ४, अनिमेश प्रभुदेसाई नाबाद ०, सलाऊदीन ४-५२, राहुल चौधरी ३-३८, हिमांशू नेहरा २-३४) व दुसरा डाव ः १ षटकात बिनबाद ०.

राजस्थान, पहिला डाव: ६७ षटकांत सर्वबाद २०९ (अंशुल गढवाल ५४, राज शर्मा ६०, करण लांबा ४१, मोहित चांगरा १५, मुकुल चौधरी १६, शुभम तारी १६-३-४८-२, लखमेश पावणे १२-३-३८-३, सनिकेत पालकर ८-१-२२-२, अभिनव तेजराणा २-०-५-०, राहुल मेहता १९-२-५४-३, अनिमेश प्रभुदेसाई ९-०-३७-०, कौशल हट्टंगडी १-०-४-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: पिळगावमधील महिला उतरल्या रस्त्यावर! सरकारसह लोकप्रतिनिधी लक्ष्य; खनिज वाहतूक बंदच

Indian Coast Guard: अंदमानजवळ बोटीतून सहा हजार किलोचे अमली पदार्थ जप्त, तटरक्षक दलाची कारवाई

Sattari: सत्तरी तालुका लवकरच टँकरमुक्त! आमदार राणे यांचा निर्धार; वेळुस येथे 1.5 कोटींच्या कामाची पायाभरणी

Goa Live News: बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा 295 धावांनी विजय

Sivakarthikeyan At IFFI: 'पोलिस व्हायचे होते पण.. '; Amaran Star ची Inspiring Journey, सभागृहात टाळ्याशिट्ट्यांची बरसात

SCROLL FOR NEXT