Blitz Chess Games: Dainik Gomantak
गोवा

Blitz Chess Games: गोव्याच्या एथन वाझला बुद्धिबळात पदक

Blitz Chess Games: राष्ट्रीय सीनियर स्पर्धा: ब्लिट्झमध्ये ब्राँझ, रॅपिडमध्ये पोडियम

किशोर पेटकर

Blitz Chess Games: गोव्याचा सर्वांत युवा इंटरनॅशनल मास्टर (आयएम) बुद्धिबळपटू एथन वाझ याने कारकिर्दीतील पहिले सीनियर पदक जिंकण्याचा पराक्रम साधला.

महाराष्ट्रातील नाशिक येथे झालेल्या स्पर्धेत बारा वर्षीय खेळाडूने ब्लिट्झ प्रकारात ब्राँझपदक पटकावले, तर रॅपिड प्रकारात पोडियम मिळवताना 11 व्या क्रमांकाचे बक्षीस प्राप्त केले.

स्पर्धेत विविध राज्यांतील खेळाडूंचा सहभाग आहे. रॅपिड प्रकारात 230 खेळाडू होते, त्यापैकी 55 जण मानांकित होते. ब्लिट्झ प्रकारात 224 पैकी 59 बुद्धिबळपटू मानांकित होते.

ब्लिट्झ प्रकारात एथनने 11 फेऱ्यांतून नऊ गुणांची कमाई केली. त्याने आठ डाव जिंकले, दोन बरोबरीची नोंद केली, तर एका डावात पराभूत व्हावे लागले. ग्रँडमास्टर दिप्तयन घोष याने साडेनऊ गुणांसह विजेतेपद पटकावले.

एथन व आर. ऋत्विक राजा यांचे समान नऊ गुण झाले. ऋत्विक याला चांगल्या टायब्रेकर गुणांमुळे उपविजेतेपद मिळाले, तर एथनला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Srisailam Visit: आंध्रात शिवरायांसमोर पंतप्रधान मोदी नतमस्तक; श्रीशैलम येथे श्री शिवाजी ध्यान मंदिर अन् शिवाजी दरबार हॉलला दिली भेट पाहा Photo

अ‍ॅलन-रविरा गोव्यात विवाहबद्ध! 'दिया और बाती हम' फेम अभिनेत्याने गर्लफ्रेन्डसोबत बांधली लग्नगाठ; पाहा Photos

आंध्रप्रदेशात पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमस्थळी शॉक लागून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरु

Abhinav Tejrana Double Century: रणजी पदार्पणातच ठोकलं द्विशतक, तेंडुलकर, कोहलीला जे जमलं नाही, ते करुन दाखवलं; अर्जुन तेंडुलकरनंतर गोव्याचा 'अभिनव' चमकला

गोवा म्हणजे फक्त Sun, Sand, Sea नाही! पर्यटनमंत्र्यांचा 'गेम-चेंजिंग' मास्टरस्ट्रोक, परशुरामाचा भव्य प्रकल्प बनणार नवी ओळख

SCROLL FOR NEXT