37th National Games Dainik Gomantak
गोवा

37th National Games: गोव्याचा 5-0 ने धुव्वा; महिला बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्र-आसाममध्ये अंतिम लढत

पूर्वा बर्वे हिने साक्षी कुरभेळगी हिला, तर श्रुती मुंदडा हिने अनुरा प्रभुदेसाई हिला नमवून महाराष्ट्राला 2-0 अशी मजबूत आघाडी मिळवून दिली.

किशोर पेटकर

37th National Games: गोव्यात सुरू असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिला बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्र व आसाम यांच्यात सांघिक सुवर्णपदकासाठी लढत होईल. स्पर्धा ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू आहे.

महिला गटात शुक्रवारी ब गटातील अखेरच्या साखळी लढतीत महाराष्ट्राने यजमान गोव्याचा 5-0 असा धुव्वा उडविला, तर ब गटात आसामने आंध्र प्रदेशला 3-2 फरकाने पराजित केले. गटसाखळीत पंजाब व आंध्र प्रदेश दुसऱ्या स्थानी राहिले. गोवा आणि पश्चिम बंगालला सामना जिंकता आला नाही.

महाराष्ट्राने अगोदरच्या लढतीत पंजाबला नमविले होते. शुक्रवारी गोव्याला त्यांनी संधीच दिली नाही. पूर्वा बर्वे हिने साक्षी कुरभेळगी हिला, तर श्रुती मुंदडा हिने अनुरा प्रभुदेसाई हिला नमवून महाराष्ट्राला 2-0 अशी मजबूत आघाडी मिळवून दिली.

दुहेरीत सिमरन सिंघी व रितिका ठाकर जोडीने लिडिया बार्रेटो व अनुरा प्रभुदेसाई जोडीस हरवून महाराष्ट्राच्या अंतिम फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. औपचारिक ठरलेल्या नंतरच्या एकेरी व दुहेरीतही महाराष्ट्राच्या वर्चस्व राहिले.

साद धर्माधिकारी हिने यास्मिन सय्यदला नमविल्यानंतर दुहेरीत श्रुती मुंदडा व अक्षया वारंग यांनी अनघा करंदीकर व अनामिका सिंग जोडीवर मात केली.

अ गटातील लढतीत अंतिम फेरीत प्रवेशासाठी आसाम व आंध्र प्रदेश यांना विजय अत्यावश्यक होता, त्यात आसामने बाजी मारली. अश्मिता चलिहा हिने नव्या कंदेरी हिच्यावर, ईशाराणी बरुआ हिने सूर्यकरिष्मा तमिरी हिच्यावर विजय नोंदवून आसामला अपेक्षित सुरवात मिळवून दिली.

दुहेरीत ईशाराणी व अश्मिता जोडीने साई उत्तेजिता राव व डी. पूजा जोडीस नमवून आसामाचा 3-0 अशा आघाडीसह विजय पक्का केला. बाकी दोन्ही लढती औपचारिक ठरल्या. त्यात आंध्र प्रदेशच्या खेळाडूंची सरशी झाली. आकांक्षा मट्टे हिने मयुरी बर्मन हिला नमविल्यानंतर दुहेरीत मामैया लंका व आकांक्षा मट्टे जोडीने मनाली बोरा व मैनी बोरुआ जोडीस पराभूत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: गोकुळाष्टमीच्या निमित्त जय श्रीराम अखिल विश्व गोसंवर्धन केंद्रात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून गोमातेची पूजा

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

Cricketer Dies: क्रिडाविश्वात खळबळ, पहिला वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या क्रिकेटपटूचं निधन

SCROLL FOR NEXT