Brahmeshananad Swami Baina Dainik Gomantak
गोवा

Baina: बायणा किनारा आरतीचे पवित्र स्थान! ब्रह्मेशानंद स्वामींचे उद्गार; सर्व धर्म-पंथांचे आदरातिथ्य करण्याचे आवाहन

Goa Spiritual Festival: सर्व धर्म, पंथांचे आदरातिथ्य करा, असे आवाहन पद्मनाभ शिष्य संप्रदायाचे सद्‍गुरू पद्मश्री ब्रह्मेशानंद स्वामी यांनी बायणा येथे केले.

Sameer Panditrao

वास्को: बायणा समुद्रकिनारा आता आरतीचे पवित्र स्थान झाले आहे, गोव्यातील समुद्रकिनारे, मंदिरे आपल्या मुळ संस्कृतीद्वारे लोकांपर्यंत पोचली पाहिजेत. तसेच आपल्या माता पित्याचा आदर करा. तसेच सर्व धर्म, पंथांचे आदरातिथ्य करा, असे आवाहन पद्मनाभ शिष्य संप्रदायाचे सद्‍गुरू पद्मश्री ब्रह्मेशानंद स्वामी यांनी बायणा येथे केले.

बायणा समुद्र किनाऱ्यावर रविवारी श्री दत्त पद्मनाभ पीठातर्फे गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवलचे भव्य आयोजन करण्यात आले. यावेळी विविध संत-महंत तसेच शेकडो भाविकांच्या उपस्थितीत समुद्र नारायण महाआरती झाली. तसेच अन्य कार्यक्रम झाले.

यावेळी भूपेंद्र गिरी, पू. संपूर्णानंद ब्रह्मचारी, स्वामी जितेंद्रानंद सरस्वती, स्वामी शंकर टिळक महाराज, स्वामी रुषिश्वरानंद, स्वामी मोहन, बाबा हठयोगी, योगी आशुतोष, कृपालुजी महाराज आदी संत महंतांची उपस्थिती होती. दुपारी तीन वाजल्यापासून लोकांनी बायणा समुद्र किनाऱ्यावर गर्दी केली होती.

वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो व वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी वास्कोतील दामोदर मंदिराजवळ सर्व संत-महंतांचे स्वागत केले. तद्नंतर दामोदर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर व आरती केल्यानंतर एका खास बसमधून मिरवणूक काढण्यात आली. यात ५० हून अधिक दुचाक्या या मिरवणुकीत सामील झाल्या होत्या. बायणा येथे आगमन झाल्यानंतर मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी स्वागत केले.

येथील हनुमान मंदिरात दर्शन घेतल्यानंतर महिलांनी कलश यात्रा काढली. समुद्रकिनाऱ्यावर स्वामीजींच्या हस्ते यज्ञकुंडात पूर्णाहुती विधी झाला. तसेच समुद्र पूजन झाले. त्यानंतर स्वामीजींचे येथे उभारण्यात आलेल्या खास व्यास‌पीठावर आगमन झाल्यानंतर प्रार्थना व गुरुवंदना झाली. तसेच संत पूजन व राष्ट्रगीत झाले. आमदार संकल्प आमोणकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तद्‌नंतर समुद्र आरती करण्यात आली. त्यानंतर योगा मास्टर विश्वास यांची योगासने झाली. उपस्थित जनसमुदायाने यात भाग घेत योगासने केली.

गोवा गोमातेची पवित्र भूमी

जितेंद्रानंदाजी स्वामी यांनी आपल्या आर्शिवचन सांगितले की, गोवा ही गोमातेची पवित्र भूमी असून ही सनातन संघर्षभूमी तसेच परशुराम भूमी आहे. या पवित्र भूमीला आध्यात्मिक भूमी करण्यास गोवावासीय आता सज्ज झाले आहे, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: ऐतिहासिक! 1972 पूर्वी अभयारण्यात आलेली, सर्व्हे आराखड्यावर नोंद असलेली एक लाख घरे कायदेशीर होणार, 1 ऑगस्टपासून प्रक्रिया

Goa Murder Case: तलवारीने केला हल्ला, डिचोलीत पतीकडून पत्नीची हत्या

Goa Assembly Session Live: स्थानिकांना डावलणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करा... आमदार चंद्रकांत शेट्ये यांची मागणी

Karun Nair: लहान मुलासारखा रडला करुण नायर, केएल राहुलने दिला आधार, सोशल मीडियावर फोटो व्हायरल; नेमकं काय झालं?

Goa Third District: तिसऱ्या जिल्ह्याचा मार्ग मोकळा; गोवा मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

SCROLL FOR NEXT