Goa Spiritual Festival 2026 Dainik Gomantak
गोवा

‘गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल’च्या तारखा जाहिर! गोमंतकीय अस्मितेचे जागतिक दर्शन; देशभरातून विविध संत-महंत होणार दाखल

Goa Spiritual Festival 2026: ‘गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल'चे आयोजन १९ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत होणार असून संगमपूर-सांगे येथे उद्‍घाटन सोहळा होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: श्री दत्त पद्मनाभपीठ, पीठाधीश्वर पद्द्मश्री विभूषित सद्‌गुरु ब्रहमेशानंद आचार्य स्वामींच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली ‘गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल २०२६’ या फेस्टिवलचे आयोजन सद्गुरू फाउंडेशनद्वारे राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने, १९ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत होणार असून संगमपूर-सांगे येथे उद्‍घाटन सोहळा होणार आहे.

या फेस्टिवलमध्ये गोमंतकीयांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय पदाधिकारी रामचंद्र नाईक यांनी केले. ते पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी निलिमा मांद्रेकर, शुभक्षण नाईक, सुवर्णलता वायंगणकर, रामचंद्र नाईक, श्रीराज शेलार, सचिन गांवकर, वेदमूर्ती साईश परब उपस्थित होते.

दरम्यान नाईक म्हणाले, गोमंतकीय अस्मितेचे जागतिक दर्शन घडविणारा हा फेस्टिवल ठरणार आहे. महामंडलेश्वर, संत, आध्यात्मिक गुरु, विविध पीठांचे पीठाधीश्वर, अाखाड्‌यांचे संत-महंत उपस्थित राहतील, असे निलिमा मांद्रेकर यांनी सांगितले.

शिवरायांच्या मूर्तीचे १९ रोजी लोकार्पण

फेस्टिवलची सुरुवात १९ रोजी सायंकाळी ४.३० वा. संगमपूर, सांगे येथे होणार असून, गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल तथा संगमपूर शिव साम्राज्य समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यावेळी श्री संगमेश्वर पूजन, संतांच्या उपस्थितीत महाआरती, कलश यात्रा व संत आशीर्वचनाचा कार्यक्रम होईल. २० रोजी सायं. ४ वा. पणजीत ‘गोवा व्हिजन समिट’ अंतर्गत पुरस्कार वितरण सोहळा व परिसंवाद होणार आहे.

२१ रोजी ‘रन फॉर स्पिरीच्युॲलिटी’

कळंगुट समुद्रकिनारी २१ रोजी सकाळी ६.३० वा. संतपूजन, हनुमान चालिसा पठण, ‘रन फॉर स्पिरिच्युअॅलिटी मॅरेथॉन’ तसेच संत सान्निध्यात समुद्रस्नान आयोजित केले आहे. २२ रोजी ४ वा. भव्य समुद्र महाआरती, रथयात्रा, श्रीमद्‌भगवद्गीता पठण होणार आहे. २३ रोजी ४ वा. पणजी येथे म्हादयी पूजन, ‘संगीत सरिता’ होणार आहे. २४ रोजी सकाळी १०.३० वा. तपोभूमी येथे ब्रहमानुष्ठानाने फेस्टिव्हलची सांगता होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drugs Case: अंमली पदार्थांविरोधात फातोर्डा पोलिसांचा 'ॲक्शन मोड'! 'इतक्या' हजारांच्या गांजा जप्त; 25 वर्षीय तरुणाच्या आवळल्या मुसक्या

US Visa Fraud Case: कॅमेऱ्यासमोर शस्त्राचा धाक, पण सगळं 'फेक'! ग्रीन कार्डसाठी 'डेंजर' जुगाड; अमेरिकन पोलिसांकडून 11 भारतीयांना बेडया

Alphonso Alert: हापूसवर युद्धाचं सावट! मध्यपूर्वेतील संघर्षाचा कोकणच्या आंब्याला फटका; निर्यातीचं गणित बिघडणार

Girdoli: 10 दिवस पाणीपुरवठा ठप्प, विहिरीचे पाणी आटले; संतप्त ग्रामस्थांचा अभियंत्याला घेराव

सूर्य दोनापावला ठिकाणी जुवारीच्या मुखात लांब जात म्हणतो, ‘कदंब, बेतीवरे, पर्वरी, बांबोळी, वेर्णा आणि साकवाळ पठारे म्हातारी झाली’

SCROLL FOR NEXT