Crime News: प्रेम, वाद अन् क्रूर हत्या! हॉटेलमध्ये प्रियकरासोबत आली अन् काळ बनून परतली; काळजाचा थरकाप उडवणारं हत्याकांड

Agra Hotel Murder Case: उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यात शुक्रवारी (17 एप्रिल) दुपारी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली.
Agra Hotel Murder Case
Agra Hotel Murder CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Agra Hotel Murder Case: उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यात शुक्रवारी (17 एप्रिल) दुपारी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. इतोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये एका महिलेने आपल्या प्रियकराची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून हॉटेलमधील कर्मचारी आणि नागरिक दहशतीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा-ग्वाल्हेर रोडवरील इतोरा चौराहा येथे असलेल्या एका हॉटेलमध्ये ही खळबळजनक घटना दुपारी 12 च्या सुमारास घडली.

फतेहपूर सिक्री येथील रहिवासी असलेला एक तरुण आपल्या प्रेयसीसोबत या हॉटेलमध्ये आला होता. दोघांनी हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील एक खोली भाड्याने घेतली होती. काही वेळानंतर या दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरुन जोरदार भांडण सुरु झाले. या वादाचे रुपांतर अचानक हिंसक वळणात झाले आणि रागाच्या भरात असलेल्या महिलेने तरुणावर प्राणघातक हल्ला केला. सुरुवातीला महिलेने तरुणाच्या डोक्यावर एका जड वस्तूने प्रहार केला, ज्यामुळे तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्यानंतरही महिलेचा (Women) राग शांत झाला नाही, तिने धारदार शस्त्राने तरुणाचा गळा चिरुन त्याची जागीच हत्या केली.

Agra Hotel Murder Case
Uttar Pradesh Crime: माणुसकीला काळिमा! 'घरात लग्न आहे, अपशकुन होईल...' आईचा मृतदेह घेण्यास मुलाचा नकार, वृद्ध बाप ढसाढसा रडला; अंत्यसंस्कारही झाले नाही

हत्येचा हा प्रकार इतका भयानक होता की, कृत्यानंतर महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहाजवळच बसून राहिली. काही वेळाने तिने स्वतःच ओरडून हत्येची कबुली दिली. ओरडण्याचा आवाज ऐकून हॉटेल कर्मचारी खोलीकडे धावले, तेव्हा तिथले दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. हॉटेल चालकाने तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी (Police) पाहिले की, महिला मृतदेहा शेजारी शांतपणे बसली होती. पोलिसांनी तिला तातडीने ताब्यात घेतले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.

Agra Hotel Murder Case
Uttar Pradesh Crime: 'राजकारण करण्यासाठी येऊ नका'; राहुल गांधींच्या भेटीपूर्वीचा रायबरेली लिचिंग पीडित कुटुंबाचा VIDEO व्हायरल

प्राथमिक तपासात समोर आले की, आरोपी महिला विवाहित असून तिला एक मुलगा देखील आहे. तिचे या तरुणासोबत प्रेमसंबंध होते, मात्र त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून काहीतरी खटके उडत होते. पोलिसांनी घटनास्थळावरुन हत्येसाठी वापरलेले साहित्य जप्त केले असून ही हत्या पूर्व नियोजित होती का, याचा तपास सुरु केला आहे. भरदिवसा गर्दीच्या ठिकाणच्या हॉटेलमध्ये घडलेल्या या हत्याकांडामुळे आग्रा पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेवर आणि हॉटेलमधील नोंदणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सध्या या महिलेची कसून चौकशी केली जात असून लवकरच या हत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com