Fiza Shaikh Sanguem: '..उड़ जा बनके आसमान दी परी'! सांगेच्‍या 'फिझा'ची अमेरिकेत चमक; आंतरराष्ट्रीय अधिकारी म्हणून नियुक्ती

Fiza Shaikh USA success: सांगेचे माजी उपनगराध्यक्ष इम्तियाज शेख आणि विद्यमान नगरसेविका फौजिया शेख यांची कन्या फिझा शेख हिने अमेरिकेत शिक्षण घेऊन नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
Fiza Shaikh USA success, Goa Sanguem student achievement
Fiza Shaikh USA success, Goa Sanguem student achievementDainik Gomantak
Published on
Updated on

सांगे: सांगेचे माजी उपनगराध्यक्ष इम्तियाज शेख आणि विद्यमान नगरसेविका फौजिया शेख यांची कन्या फिझा शेख हिने अमेरिकेत शिक्षण घेऊन नेत्रदीपक यश संपादन केले आहे. विशेष म्‍हणजे तिला तेथेच, त्याच महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे.

पदवी मिळवल्यानंतर फिझाने अमेरिकेतील लड्स बेकेट्ट युनिव्हर्सिटीमधून प्रकल्प व्यवस्थापन विषयात मास्टर्स पदवी विशेष श्रेणीत संपादन केली. तिच्या यशाची दखल घेत, त्याच विद्यापीठात तिला आंतरराष्ट्रीय अधिकारी म्हणून नियुक्त करण्‍यात आले आहे.

Fiza Shaikh USA success, Goa Sanguem student achievement
Sanguem: ..अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली! सांगेतील माय-लेकीला मिळाला हक्काचा निवारा; मंत्री फळदेसाईंचा पुढाकार

दरम्‍यान, या यशाबद्दल फिझा शेख हिच्‍यावर सांगे तसेच राज्‍यभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिच्‍या यशामुळे सांगेवासीयांना अभिमान वाटत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

Fiza Shaikh USA success, Goa Sanguem student achievement
Sanguem: सांगे येथील खाणीला अखेर पर्यावरण दाखला मंजूर! जलस्रोत, ग्रामस्थांचे आरोग्य, श्रद्धास्थानांचे रक्षण करण्याचे मोठे आव्हान

झोपडपट्टीतील मुलांना लावली शिक्षणाची गोडी

फिझाने आपले प्राथमिक शिक्षण सांगे येथील किंग्स स्कूलमध्‍ये पूर्ण केले. पुढे पेद्रो कोन्‍सेसांव अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियंता पदवी मिळवली. या काळात तिने ‘स्माईलकिपर फाऊंडेशन’ची स्थापना करून झोपडपट्टीतील मुलांना शिक्षणाची गोडी लावली, त्‍यांच्‍यात स्वच्छतेबाबत जागृती केली. तसेच गरजूंना धान्य व कपडे वाटप यासारखे उपक्रम राबवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com