Govind Gaude Dainik Gomantak
गोवा

Govind Gaude: गावडे-तवडकर वादावर पडदा; कला-संस्‍कृती मंत्री म्हणतात माझ्यासाठी 'विषय संपला'

Govind Gaude: सभापती रमेश तवडकर आणि कला-संस्‍कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्‍यातील वादाचे प्रकरण बासनात गुंडाळून ठेवण्‍यास सरकार यशस्‍वी ठरले.

Ganeshprasad Gogate

Govind Gaude: मागील काही दिवस राज्यात गाजत असलेल्या तवडकर - गावडे वादासंबंधी नवनवीन अपडेट येत असून नुकतीच गावडे यांनी या प्रकरणासंबंधी आपली प्रतिक्रिया दिलीय.

''त्या विषयावर मला आता काहीच बोलायचे नाही. माझ्यासाठी तरी तो विषय संपलाय'' असे सांगून गावडेंनी या प्रकरणावर पडदा टाकायचा प्रयत्न केलाय.

या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता सुरुवातीला या दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी केला होता.

''हा त्यांच्यातला अंतर्गत वाद आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा वाद सोडवला जाईल'', असे म्हणत हे प्रकरण शमवण्याचा प्रयत्न केला होता.

तसेच दुसऱ्याच दिवशी तानवडे, तवडकर आणि गावडे यांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एकत्रित बैठकही झाली होती.

त्यानंतर सभापती रमेश तवडकर आणि कला-संस्‍कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्‍यातील वादाचे प्रकरण बासनात गुंडाळून ठेवण्‍यास सरकार यशस्‍वी ठरले होते.

हा वाद संपतो न संपतो तोच गावडे - तवडकर वादाला नवीन तोंड फुटत ऑडिओ क्लिपची फोडणी मिळाली होती.

गावडे आणि आदिवासी कल्याण संचालक दशरथ रेडकर यांच्यातील संभाषणाची ध्वनिफीत सार्वत्रिक झाल्यानंतर समाज माध्यमांवर त्याचे एकच पडसाद उमटू लागले होते.

त्यानंतर माजी मंत्री प्रकाश वेळीप यांनी या वादात उडी घेत तवडकरांवर गंभीर आरोप केले. अखेर आज शनिवारी गावडे यांनीच माझ्यासाठी तो विषय आता संपलाय, असे म्हणत वाद संपवण्याचा प्रयन्त केलाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT