गणेशोत्सवासाठी (Ganesh Chaturthi) घरोघरी भटजींना बोलावू नका, असा सरकारी फतवा निघाला खरा. मात्र, त्याचे परिणाम काय होतील, हे भाजपच्या (BJP) लक्षात आले आणि काही तासांतच सरकारी आदेश स्थगित ठेवण्याची वेळ आली. विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) तोंडावर पौरोहित्य करणारा वर्ग नाराज झाला तर ती नाराजी कुठे कुठे भोवू शकते, याचे गणित मांडले गेले आणि सरकारला आदेश दुरुस्तीच्या कानपिचक्या भाजपकडून मिळाल्या. एकंदरीत भटजींचा भाजपवर किती प्रभाव आहे, याचे जणू दर्शनच या सरकारच्या घुमजावातून दिसले आहे.
गणरायाला साकडे
गेल्या वर्षीची चतुर्थी यथातथाच झाली. कोविडमुळे लोकांना चतुर्थी व्यवस्थित साजरी करायला मिळालीच नाही. यंदा कोरोनाचे प्रमाण त्यामानाने कमी असल्याने चतुर्थी मोठ्या उमेदीने साजरी करण्याचा चंग गणेश भक्तांनी बांधला आहे. कोविडमुळे खिशात जेमतेमच पैसा आहे; पण खरेदी जोरात सुरू आहे. त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे काही आमदार, मंत्र्यांनी कडधान्याच्या पोटल्या मतदारांपर्यंत पोचवल्या आहेत. या आमदार, मंत्र्यांचे कार्यकर्ते मतदारसंघातील मतदार आणि त्यांचे रेशनप्रमाणे कुटुंब अशी आकडेमोड करून या पोटल्या पोचवत आहेत. जाऊ दे, एका अर्थाने 2017 च्या निवडणुकीतील ही शेवटची चतुर्थी, पुढल्या वर्षी निवडणूक. त्यामुळे या आमदार, मंत्र्यांनी चतुर्थीचा आधार घेत पोटल्या पोचवण्यासाठी आटापिटा चालवला आहे. पोटल्या पोचवाच, पण गणराया या पोटल्या घेणाऱ्या मतदारांना संबंधिताला मतदान करायची बुद्धी दे रे बाबा, असे म्हणावे की आणखी काही, तेच समजत नाही.
‘एसओपी’ पालनाचे आवाहन
पिंपळकट्टा सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ ट्रस्ट यंदा गणपती उत्सवाचे 65 वर्ष साजरे करीत आहे. त्यामुळे कोविड महामारीचा धोका पूर्ण टळला नसला तरी सर्व सरकारी मार्गदर्शक नियमांचे पालन करुन यंदा ट्रस्टने पाच दिवस म्हणजे 10 ते 14 सप्टेंबर दरम्यान गणपती उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार सकाळी गणेश मूर्तीची विधिवत स्थापना होणार. 14 रोजी संध्याकाळी 4.30 वाजल्यापासून विसर्जनास सुरुवात होईल. आके, मडगाव येथील सार्वजनिक गणपती गेल्या वर्षाप्रमाणे केवळ दिड दिवसाचा साजरा केला जाणार आहे. यंदा कुठलाही मनोरंजनाचा, भजनाचा किंवा स्पर्धात्मक कार्यक्रम होणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.