डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना वंदन करतांना भाजपचे गोवा प्रभारी सी. टी. रवी. सोबत अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, दामोदर नाईक, सिध्देश पेडणेकर व ईतर Dainik Gomantak
गोवा

Goa: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अंत्योदय तत्वावर समाजाचा विकास करण्याचे स्वप्न

नरेंद्र मोदींनी सत्तेवर आल्यानंतर डॉ. आंबेडकर यांचे पंचधाम विकसित करतानाच दलितासाठी अनेक योजना आखून त्यांची अंमलबजावणी केली

दैनिक गोमन्तक

पणजी: भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे अंत्योदय तत्वावर समाजाचा विकास करण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार करत आहे . देशातील दलितांच्या विकासासाठी अनेक योजना राबवताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची समाधी , स्मारके बांधण्याचे तसेच त्यांचे लंडनमधील घर दुरुस्त करण्याचे काम भाजपाने केले आहे.

नागरिकांनी डॉ. आंबेडकर यांना निवडणुकीत पराभूत करणाऱ्या काँग्रेस सारख्या पक्षापासून दूर राहावे. असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव तसा तथा गोवा प्रभारी सि. टी. रवी यांनी केले.

6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी तथा महानिर्वाण दिवसाच्या निमित्ताने भाजपाच्या पणजी येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सि. टी. रवी बोलत होते. रवी यांच्यासोबत भाजपाचे(BJP) प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष सिद्धेश पेडणेकर, भाजपा प्रदेश सरचिटणीस दामोदर नाईक तसेच इतर उपस्थित मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बोलताना सि. टी. रवी यांनी सांगितले की संविधान निर्माता असलेले डॉ. आंबेडकर यांच्यासोबत काँग्रेसने नेहमीच अन्याय केला. फक्त डॉ. आंबेडकरच नव्हे तर सरदार वल्लभाई पटेल आणि सुभाषचंद्र बोस यांच्या बाबतीतही काँग्रेसने अन्याय केला आहे. कॉंग्रेसने (congress) स्वतःची घराणेशाही वाढवली.

नरेंद्र मोदींनी सत्तेवर आल्यानंतर डॉ. आंबेडकर यांचे पंचधाम विकसित करतानाच दलितासाठी अनेक योजना आखून त्यांची अंमलबजावणी केली आहे. कॉंग्रेसच्या सरकारच्या काळात स्वतःलाच भारतरत्न पुरस्कार घेणारे जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी डॉ. आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार दिला नव्हता. भाजपाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी व्ही पी सिंग सरकारच्या काळामध्ये प्रस्ताव दिल्यानंतरच डॉ. आंबेडकर यांना भारतरत्न देण्यात आला होता. असेही रवी यांनी यावेळी सांगितले.

1952 च्या लोकसभा निवडणुकीत (election) काँग्रेसने डॉ. आंबेडकर यांना हरवले होते. याची आठवण करून देऊन डॉ. आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे रवी म्हणाले. येत्या काळात सुद्धा देश पातळीवर असो किंवा गोव्यात असो दलितांचा विकास होत राहणार आहे. त्यासाठी भाजप काम करत राहील. मात्र भारताचे तुकडे करणाऱ्या पक्षापासून लोकांनी सावध राहावे. असे आवाहन शेवटी रवी यांनी केले. याप्रसंगी बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार होते. त्यांचे कार्य श्रेष्ठ कार्य आहे. समाजाला सुशिक्षित करून देशात परिवर्तन घडू शकते हे त्यांनी दाखवून दिले होते. त्यांचे कार्य नेहमीच लोकांच्या स्मरणात राहील असे तानावडे म्हणाले. या प्रसंगी संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर रहे. अशा घोषणा उपस्थितांनी दिल्या .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Made Liquor Seized: गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; सिंधुदुर्गातील इन्सुली चेकपोस्टवर 6.80 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Goa Spa Scam: गोव्यात 'स्पा'च्या नावाखाली फसवणूक? पर्यटकाने सांगितला धक्कादायक अनुभव; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल!

Gautam Gambhir Fight: तू येथून निघ... पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी गौतम गंभीरचं इंग्लंडमध्ये झालं भांडण! पाहा VIDEO

रेस्टॉरंटमध्ये अचानक घुसला 'छोटा' पाहुणा, कर्मचाऱ्याने प्रेमाने दिला नाश्ता; हृदयस्पर्शी Video Viral

Goa Assembly Session: गोव्यात पर्यटक घटले! सरकारने आत्मचिंतन करावे- विरोधी पक्षनेते युरी आलेमाव

SCROLL FOR NEXT