DA Hike | Money Dainik Gomantak
गोवा

DSSS: 'दयानंद सुरक्षा' योजनेसाठी 2101 लाभार्थी अपात्र; 6800 जणांची नावे वगळली

Dayanand Samajik Suraksha Yojana: समाज कल्याण संचालनालयाने दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या (डीएसएसएस) लाभार्थी म्हणून सूचिबद्ध केलेल्या ६,८०० हून अधिक व्यक्तींची नावे हटविली आहेत.

Sameer Panditrao

पणजी: गेल्या दोन महिन्यांत समाज कल्याण संचालनालयाने दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या (डीएसएसएस) लाभार्थी म्हणून सूचिबद्ध केलेल्या ६,८०० हून अधिक व्यक्तींची नावे हटविली आहेत. यापैकी २१०१ लाभार्थी या योजनेसाठी अपात्र असल्याचे आढळले, तसेच ४ हजार ७०० लाभार्थी मृत किंवा शोधता न येण्यासारखे असल्याचे निदर्शनास आले आहे.

गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या मदतीने आणि डेटा ॲनालिटिक्सचा वापर करून विभागाने त्याचा डेटा इतर विभागांशी जुळविला असता त्यात २१०१ लाभार्थी अपात्र असल्याचे आढळले.

त्यामागील कारण म्हणजे हे लाभार्थी व्यवसाय चालवताना आणि उत्पन्न मर्यादा निकष ओलांडत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. काहींच्या मालकीच्या अनेक टॅक्सी, गेस्ट हाऊस, जलक्रीडा उपक्रम आणि बार असल्याचे आढळले. काही प्रकरणांमध्ये, दोन्ही पती-पत्नी या योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळले आहे. इतरांमध्ये जोडीदारांपैकी एक सरकारी कर्मचारी असल्याचे आढळले आहे.

इतर ४ हजार ७०० लाभार्थींमध्ये सर्व ८० वयोगटावरील आहेत. त्यामुळे एक तर ते मृत किंवा शोधण्यायोग्य नसलेले दिसत आहे. त्यांनी दिलेला पत्ताही सध्या सापडत नाही. सध्या राज्यभर सर्वेक्षण सुरू आहे. नोव्हेंबरमध्ये सर्वेक्षण सुरू झाले, तेव्हा योजनेचे १ लाख ३७ हजार ६२३ लाभार्थी होते, ज्याचा मासिक भार सरकारला सुमारे २९ कोटी रुपये उचलावा लागत होता. इतर खात्यांच्या योजनांपेक्षा ही योजना वेगळी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT