Punjab Sniffer Dog Urus helping in Goa: Dainik Gomantak
गोवा

Goa Sniffer Dog: गोव्याच्या मदतीला धावला पंजाबचा 'उरूस'; पेट्रोलियम पाईपलाईनमधील गळती शोधण्यास सुरवात

Akshay Nirmale

Punjab Sniffer Dog Urus helping in Goa: दाबोळीतील विहिरी आणि जलस्रोतांच्या प्रदुषणाचा प्रश्न सध्या गाजत आहे. नुकतेच झुआरी इंडियन ऑइल टँकिंग लिमिटेड (ZIOTL) ने त्यांच्या पाईपलाइनमधील संभाव्य गळती शोधण्यासाठी पंजाबमधील एका विशेष कुत्र्याची मदत घेतली आहे.

'उरुस' असे या कुत्र्याचे नाव आहे. तो नर असून बेल्जियन मालिनॉइस जातीचा आहे. त्याला विशेष वाहनाने गोव्यात आणावे लागले.

या स्नायफर डॉगने बुधवारी तीन ठिकाणांची ओळख पटवली असून ZIOTL च्या अधिकाऱ्यांनी या जागेवर उत्खननही सुरू केले आहे.

कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार "हा कुत्रा पेट्रोलियम उत्पादनांची गळती शोधण्यात उत्कृष्ट आहे आणि उत्तर भारतात इतरत्र भूमिगत पाइपलाइनमधून पेट्रोलियम उत्पादने शोधण्यात या कुत्र्याला यश आले आहे."

“आमच्या कंपनीनेही आता ही सेवा घेतली आहे. पाइपलाइनमधील गळती शोधण्यासाठी या डॉगचा वापर केला जात आहे. एकाच वेळी पाइपलाइनच्या आजूबाजूच्या साइट्सचे उत्खनन करत आहोत. तथापि, आत्तापर्यंत कोणतीही गळती सापडलेली नाही.”

या कुत्र्याला विमानाने किंवा ट्रेनने नेले जाऊ शकत नसल्यामुळे आम्ही उरूसला गोव्याला नेण्यासाठी खास वाहन देण्याचा निर्णय घेतला. 72 तासांचा प्रवास करून हा कुत्रा कारने गोव्यात दाखल झाला.

कुत्र्याच्या ट्रेनरसह इतर तीन व्यक्तींनाही सोबत आणले आहे. हा कुत्रा मंगळवारी आल्यानंतर त्याला माटवे येथील विहिरीत नेण्यात आले होते.

तथापि, आंदोलन करणाऱ्या मोठ्या संख्येने जमलेल्या लोकांना पाहून कुत्रा घाबरला. कुत्र्याने 72 तासांपेक्षा जास्त प्रवास केला होता आणि तो थकला होता. त्यानंतर त्याला कंपनीत विश्रांतीसाठी पाठवले.

बुधवारी या कुत्र्याला घटनास्थळी नेण्यात आले आणि बिर्ला मंदिरापासून रेल्वे क्रॉसिंगपर्यंत सुमारे 3 किलोमीटरपर्यंत पेट्रोलियम लाईनने फिरवले गेले. उरूसने तीन ठिकाणे ओळखली असून सध्या या जागेवर उत्खनन सुरू करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT