पणजी: प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणावर दरवर्षी कमी खर्च होणाऱ्या राज्यांच्या यादीत गोवा देशात सहाव्या स्थानी आहे. राज्यात दरवर्षी प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणावर ९,७३५ रुपयांचा खर्च होतो, तर, सर्वाधिक खर्च चंदिगडमध्ये (४९,७११ रुपये) होत असल्याचे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या ‘चिल्ड्रन इन इंडिया’ अहवालातून समोर आले आहे.
राज्यांमधील प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणावर दरवर्षी किती रुपये खर्च करण्यात येतात याची आकडेवारी मंत्रालयाने या अहवालातून सादर केलेली आहे. हा खर्च अभ्यासक्रम फी, वाहतूक, गणवेश, स्टेशनरी आणि इतर अशा स्वरुपात देण्यात आलेला आहे.
त्यानुसार गोव्यातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रम शुल्कावर ३,२३९ रुपये, वाहतुकीवर १,३५३ रुपये, गणवेशावर १,२१० रुपये, स्टेशनरीवर २,२११ रुपये आणि इतर वस्तूंसाठी १,७२१ रुपये मिळून एकूण ९,७३५ रुपये खर्च होत असल्याचे या आकडेवारीतून दिसून येते. दरम्यान, देशभरात प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणावर सरासरी १२,६१६ रुपये खर्च होत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
राज्य खर्च
चंदिगड ४९,७११
हरयाणा २५,७२०
मणिपूर २३,५०२
पंजाब २२,६९२
तामिळनाडू २१,५२६
दादरा–नगरहवेली २०,६७८
तेलंगण २०,५९०
राज्य खर्च
लक्षद्वीप १,८०१
बिहार ५,६५६
छत्तीसगड ५,८४४
झारखंड ७,३३३
ओडिशा ७,४७९
गोवा ९,७३५
मध्यप्रदेश ९९४८
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.