Goa News | Delilah Lobo Dainik Gomantak
गोवा

Goa News: शिवोलीत जोडरस्त्याचे काम लवकरच होणार- लोबो

Goa News: मार्ना-शिवोली या दोन्ही गावांना जोडणारा पोर्तुगीजकालीन जोडरस्ता आणि बांधाच्या दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेण्यात येईल.

दैनिक गोमन्तक

Goa News: सडये तसेच मार्ना-शिवोली या दोन्ही गावांना जोडणारा पोर्तुगीजकालीन जोडरस्ता व तेथील बांधाच्या दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असून त्यासाठी खुद्द मुख्यमंत्री शिवोलीत उपस्थित राहाणार असल्याचे शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांनी शिवोलीत सांगितले.

येथील पोर्तुगीजकालीन जोडरस्ता या भागातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा असा दुवा असून सध्याच्या दुरवस्थेमुळे वाहतुकीबरोबरच या भागातील हजारो हेक्टर शेतजमीन पडिक बनल्याचे लोबो यांनी यावेळी सांगितले.

मार्ना-शिवोली येथील शेतकऱ्यांना मळणीसाठी मोफत यंत्राचे उद्‌घाटन केल्यानंतर लोबो बोलत होत्या. यावेळी पंचसदस्य संदेश हडफडकर, अमित मोरजकर, माजी सरपंच सिल्वेस्टर फर्नांडिस तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, सडये तसेच शिवोली जोडरस्त्यासाठी एकूण सहा कोटींहून अधिक निधी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून मंजूर करण्यात आलेला असून येत्या महिन्याभरात येथील कामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे लोबो यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या आधी दिलेल्या आश्वासनांप्रमाणे यंदाही शिवोली मतदारसंघातील एकूण सहाही पंचायतींत मळणी यंत्रांची मोफत सेवा देण्यात येणार असून राहिलेल्या पडिक शेतजमिनी शेती लागवडीखाली आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

SCROLL FOR NEXT