MGP Leader Dhavalikar in Press Conference in Panjim - Goa on 21 August, 2021.
MGP Leader Dhavalikar in Press Conference in Panjim - Goa on 21 August, 2021.  Dainik Gomantak
गोवा

Goa: सुदिन ढवळीकर कडून मगो-भाजप युतीचे संकेत !

विठ्ठल पारवाडकर

पणजी: भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते व केंद्रिय मंत्री श्रीपाद नाईक (Union Minister Shripad Naik) यांच्याबद्दल आपणास आदर आहे. त्यांनी मगो पक्षासोबत (MGP) भाजपची युती व्हावी, असे जे म्हटले आहे. त्यांचाही आपण आदर करतो. मगो पक्ष भाजप सोबत युती करेल की नाही हे आपण सांगू शकत नाही. तो निर्णय मगो पक्षाची केंद्रिय समिती (Central Committee of MGP )घेईल. असे प्रतिपादन मगो पक्षाचे आमदार व विधीमंडळ नेते सुदिन ढवळीकर (MGP MLA Sudin Dhawalikar) यांनी आज केल्याने मगो पक्ष येत्या काळात भाजपशी युती करु शकतो. या शक्येला दुजोरा मिळाला आहे.

पणजी (Goa) येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत ढवळीकर यांना श्रीपाद नाईक यांनी भाजप - मगोप ची युती व्हावी, असे जे मत व्यक्त केले आहे, त्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता ढवळीकर यांनी वरील प्रतिपादन केले. मगो पक्षाला हव्या असलेल्या जागा भाजपने दिल्या तर युती होईल का? असा दुसरा प्रश्‍न विचारला असता, आपण ही शक्यता नाकारत नाही असे सांगून मगोची केंद्रिय तथा राज्य कार्यकारीणीच युतीचा निर्णय घेणार असल्याचे ढवळीकर म्हणाले.

सध्या मगो पक्षाने १२ उमेदवार तयार ठेवले आहेत. इतर सहा जागी तयारी सुरु आहे. काही जागी अपक्ष उमेदवारांना पाठिबा दिला जाईल. असेही ढवळीकर यांनी यावेळी सांगितले. मगो पक्षाचे २१ आमदार आले तर गोव्याला स्वच्छ प्रशासन देऊ. असेही ते म्हणाले.

तरुणीच्या गूढ मृत्यु प्रकरणी तपाय योग्य दिशेने नाही

नास्नोडा येथील युवतीचा मृत्यू कसा झाला? याचा तपास पोलिस अकरा दिवस झाले तरी करु शकलेले नाहीत. पोलिसांनी तिचा व्हीसेरा अद्याप गोमेकॉला दिलेला नाही. यावरुन गोमेकॉ व पोलिस यांच्यात संघर्ष असल्याचे स्पष्ट होते. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. मुख्यमंत्र्यानी पक्षाचे दौरे करण्यापेक्षा लोकांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे. अशी टीका यावेळी सुदिन ढवळीकर यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

SCROLL FOR NEXT