Shri Kamaleshwar Higher Secondary School celebrates Guru Purnima with enthusiasm  Dainik Gomantak
गोवा

Goa: श्री कमलेश्वर उच्चमाध्यमिक विद्यालयात गुरू पौर्णिमा उत्साहात साजरी

प्राचार्य सुदन बर्वे यांनी व्यासांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

दैनिक गोमन्तक

मोरजी: कोरगाव येथील श्री कमलेश्वर उच्चमाध्यमिक विद्यालयात गुरू पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य सुदन बर्वे यांनी व्यासांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अध्यपिका सौ. जुही थळी, अध्यापक प्रशांत रासाईकर, सौ.भारती पंचवाडकर, श्री समीर मांद्रेकर, श्री अंकुश बुगडे, सौ.दीपश्री सोपटे, श्री नेहाल कशाळकर, दत्तात्रय गवस, गोपाळ शेट्ये, अशोक परब, प्रशांत गावडे, आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्राचार्य सुदन बर्वे म्हणाले, भारतीय संस्कृती मध्ये गुरू शिष्य परंपरेला अनन्य साधारण महत्व आहे.आज आधुनिक काळातही गुरूचे महत्व अबाधित आहेच गुरूचा सन्मान आपण करायलाच हवा.

दरम्यान, कोविड महामारीमुळे विद्यार्थी शाळेत उपस्थित राहू शकत नसल्याने प्रत्यक्ष गुरू पौर्णिमा साजरी करणे शक्य झाले नसले तरी श्री कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयातील केरी, पालये, हरमल, कोरगाव , पार्से,पेडणे आदी भागातील विद्यार्थ्यांनी आपापल्या भागातील शाळात जावून आपल्या शिक्षकांना पुष्प अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतले. गेली अनेक वर्षे या विद्यालयात ही परंपरा कायम चालू आहे. यावर्षीही त्यांनी ही परंपरा चालू ठेवतांना आपल्या प्राथमिक तसेच हायस्कूल मधील शिक्षकांच्या भेटी घेवून त्यांचे आशीर्वाद घेतले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

SCROLL FOR NEXT