Sports Job Quota Goa Dainik Gomantak
गोवा

Prakash Padukone: राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय स्थरांवर प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना नोकरी देणं ही अडचण नसावी- प्रकाश पदुकोण

Sports Job Quota Goa: इतर राज्यांच्या तुलनेत कमी लोकसंख्या असलेल्या राज्यात नोकऱ्या उपलब्ध करून देणं ही सरकारसाठी अडचण नाही

गोमन्तक डिजिटल टीम

माजी ऑल-इंग्लंड चॅम्पियन प्रकाश पदुकोण यांनी प्रत्येक राज्यामध्ये क्रीडा विषयक नोकरीसाठी एक धोरण असायला हवे या मुद्यावर भर दिला. प्रकाश पदुकोण यांनी अलीकडेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी दोहा, कतार येथे बॅडमिंटन अकादमीची सुरुवात केली.

इतर राज्यांच्या तुलनेत गोवा हे राज्य छोटं आहे आणि तरीही राज्यातून फुटबॉलपटूंसह इतर खेळाडूंना सरकारी नोकऱ्या मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत.

यावर प्रकाश पदुकोण म्हणतात की ज्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केलेय अशा लोकांना नोकऱ्या देण्यात कोणलाही अडचण असू नये आणि इतर राज्यांच्या तुलनेत कमी लोकसंख्या असलेल्या राज्यात नोकऱ्या उपलब्ध करून देणं ही सरकारसाठी अडचण नाही असं देखील ते म्हणालेत.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तनिषा क्रास्टोच्या प्रवासाचा दाखला देत त्यांना भारतात खेळाडूंना हवी ती मदत न मिळाल्याचा उल्लेख केला. तनिषा क्रास्टो ही स्वतः पदुकोण अकादमीची विद्यार्थिनी आहे.

पदुकोण अकादमीने प्रतिभावान तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी ॲथलेन स्पोर्ट्ससोबत हातमिळवणी केली असून यापुढे देखील देशातील तरुणानं मदत मिळावी म्हणून ते अशाप्रकारे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही स्वतः प्रकाश पदुकोण यांनी दिली.

इंडियन स्पोर्ट्स सेंटर इंडियन कप ओपन बॅडमिंटन स्पर्धेत प्रकाश पदुकोण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, भारतातील अधिकाधिक तरुणांना बॅडमिंटनबद्दल प्रोत्साहन देणं हाच त्यांचा प्रमुख उद्देश असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT