Ramesh Tawadkar | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Ramesh Tawadkar: आशावादी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारी माणसेच इतिहास घडवतात

Ramesh Tawadkar: ‘ऋषितुल्य धन्वंतरी गोमंत भूषण डॉ. सखाराम गुडे’ पुस्तकाचे प्रकाशन

दैनिक गोमन्तक

Ramesh Tawadkar: गोमंतभूषण डॉ. सखाराम गुडे यांनी हयातभर समर्पितवृत्तीने धन्वंतरी म्हणून रुग्णसेवा करावी, हे एकच ध्येय बाळगले. त्यांचे जीवनचरित्र नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे,असे प्रतिपादन सभापती रमेश तवडकर यांनी केले.

डॉ. सखाराम गुडे यांच्यासारखी आशावादी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून समाजाच्या हितासाठी कार्यकरणारी माणसेच इतिहास घडवतात,असेही ते म्हणाले.

गोमंतकीय साहित्यिक रमेश वसंकर यांनी लिहिलेल्या ‘ऋषितुल्य धन्वंतरी गोमंत भूषण डॉ. सखाराम गुडे’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने तवडकर बोलत होते.

अध्यक्षस्थानी सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, प्रमुख वक्ते म्हणून प्रा. अनिल समांत, सन्माननीय पाहुणे म्हणून किसन फडते, सरपंच पल्लवी शिरोडकर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुभाष प्रभुदेसाई तसेच लेखक रमेश वंसकर हे व्यासपीठावर होते.

लेखक रमेश वंसकर यांनी मनोगत व्यक्त केले. किसन फडते. सरपंच पल्लवी शिरोडकर यांनी डॉ. गुडेंच्या कार्याचा आढावा घेणारी भाषणे झाली.

"नाणं कमविण्यासाठी जीवन जगावं, की जीवनाचं गाणं व्हावं, यासाठी कार्यरत व्हावं, हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. परंतु डॉ. सखाराम गुडे यांनी रुग्णांच्या जीवनात प्रकाश आणला. डॉ. गुडेंची परंपरा चालवणारे डॉक्टर गोमंतकाच्या पुण्यभूमीत घडावेत."

- प्रा. अनिल सामंत,मुख्य वक्ते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Sri Lanka Test Series: 9 वर्षांनंतर श्रीलंकेत टीम इंडियाची कसोटी मालिका; पहिला सामना कधी? LIVE कुठे पाहता येणार? वाचा...

Odern Kewda Leaves: हिमालयाच्या निर्मितीपूर्वीपासून भारतात केवड्याचे अस्तित्व! 2.4 कोटी वर्षे जुन्या जीवाश्मांनी उलगडला प्राचीन वनस्पतीचा अद्भुत इतिहास

Virendra Singh Baisoya: 6000 कोटींच्या ड्रग्ज सिंडिकेटचा सूत्रधार भारताच्या ताब्यात, बापाच्या अटकेनंतर लेकावर तपास यंत्रणांची करडी नजर; कोण आहे वीरेंद्र सिंह बसोया?

Goa POCSO Case: सात वर्षांच्या नात्यानंतर बलात्काराचा गुन्हा ग्राह्य नाही! 'पोक्सो' कोर्टानं फेटाळला आरोप; संशयित दोषमुक्त

Goa Disability Pension: 13 वर्षांपासून मानधन जैसे थे! दिव्यांगांना 8 हजार मानधन द्या; गोवा दिव्यांग हक्क संघटनेची मुख्यमंत्र्याांकडे मागणी

SCROLL FOR NEXT