Goa Dhendlo | धेंडलो उत्सव, गोवा Dainik Gomantak
गोवा

Dhendlo Utsav: ‘दे धेंडलो, धेंडल्यान पावस शेणलो’! लोकगीतांच्या गजरात गोव्यात 'धेंडलो उत्सव' साजरा

Dhendlo Festival Goa: शेकडो वर्षांची परंपरा असलेला धेंडलो उत्सव दिवाळी पाडव्याच्या दिवशी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. ‘दे धेंडलो, धेंडल्यान पावस शेणलो’ अशी पारंपरिक लोकगीते गाऊन ढोल-ताशांच्या निनादात गावातील वाड्यावाड्यांवर आज धेंडलो उत्सव झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Dhendlo Utsav On Diwali Padwa 2024

शिरोडा: ‘दे धेंडलो धेंडल्यान पावस शेणलो’ अशी पारंपरिक धेंडलो गीते ढोलताशांच्या तालावर सुरात गाऊन पारंपरिक धेंडलो नृत्य करत गावांतील वाड्यावाड्यावर दीपावली पाडव्यानिमित्त धेंडलो उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.

शिरोडा गावातील सर्व भागात धेंडलो घुमटी सजवून त्यात श्रीकृष्णाची मूर्ती अधिष्ठित केली गेली. झेंडूच्या फुलांनी धेंडलो घुमटी सजवण्यात आली. पेडे-शेणवीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरात सकाळी धार्मिक विधी करून धेंडलो मिरवणुकीला प्रारंभ झाला. आस्कण, पर्तळ, चावणूकोमांड, वाजे, काराय, पाज, तरवळे या सर्वच भागात धेंडल्याच्या मिरवणुका काढण्यात आल्या. घरोघरी जाऊन धेंडलो नाचवण्यात आला. सुवासिनींनी धेंडल्याची पूजा करून त्यांना श्रीफळ, तांदूळ व दक्षिणा दिली.

या दिवाळी पाडव्याच्या सणानिमित्त शेतकऱ्यांनी सकाळी आपल्या गुरांना आंघोळ घालून त्यांची शिंगे रंगवली व त्यांच्या अंगावर झूल चढवली. गुरांची पूजा करून त्यांना खायला पोळा दिला. त्यानंतर गुरांना चरण्यासाठी रानात सोडण्यात आले.

बोरीत सर्वत्र धेंडलो मिरवणूक उत्साहात

बोरी गावात दिवाळी पाडव्यानिमित्त पारंपरिक धेंडलो उत्सव शनिवार, २ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. दिवाळी पाडव्यानिमित्त शेतकरीवर्गाने आपल्या गुरांना पहाटे आंघोळ घालून त्यांच्या अंगावर झूल चढवून पूजा केली व खायला पोळा दिला.

देऊळवाडा-बोरी येथील श्री गोपाळकृष्ण मंदिरात धेंडलो घुमटीत श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून त्याची पूजा केली. तसेच तिशे, खाजोर्डा, बेतकी, पाणीवाडा, तामशिरे, शिरशिरे आदी भागातील लोकांनी धेंडलो सजवून वाद्याच्या तालात ‘दे धेंडलो धेंडल्यान पावस शेणलो’ अशी पारंपरिक गीते गाऊन घरोघरी जाऊन धेंडलो नाचवले. सुवासिनींनी धेंडल्याची पूजा करून दक्षिणा, तांदूळ, नारळ दिले. या धेंडलो उत्सवात गावातील लहान, थोर मंडळी सहभागी झाली होती.

सावईवेरेत धेंडलो उत्सव उत्साहात

सावईवेरे येथील शेकडो वर्षांची परंपरा असलेला धेंडलो उत्सव दिवाळी पाडव्याच्या दिवशी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. ‘दे धेंडलो, धेंडल्यान पावस शेणलो’ अशी पारंपरिक लोकगीते गाऊन ढोल-ताशांच्या निनादात सावईवेरे गावातील वाड्यावाड्यांवर आज धेंडलो उत्सव झाला. या उत्सवाची परंपरा या गावातील युवक पुढे नेत आहेत.

विविधरंगी कागदांनी व सुवासिक फुलांनी लाकडी घुमटी सुशोभीत करून घुमटीत श्रीकृष्णाची छोटी मूर्ती अधिष्ठित करण्यात आली. पूर्वापार पद्धतीने पूजा - अर्चा करून धेंडलो डोक्यावर घेऊन वाद्यांच्या तालात धेंडलो नाचवत व पारंपरिक लोकगीते म्हणत गावातील वाड्या-वाड्यावरील घरोघरी धेंडल्याची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ज्येष्ठ मंडळीसह बराच युवक तसेच बालवर्गाचाही समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli Viral Post: विराट कोहलीचा दोन वर्षांनंतर मोठा निर्णय; सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टनं खळबळ!

Mandovi Bridge: मांडवी पुलावर 'नो एन्ट्री'! 11 जानेवारीला 'या' वेळेत नव्या आणि जुन्या पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद

Raia Fire News: ..आणि बघता बघता डोंगरच पेटला! राय येथील घटना; अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न

Tara Sutaria Breakup: तारा सुतारिया आणि वीर पहाडियाचे ब्रेकअप? 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर नात्यात दुरावा Watch Video

Goa Nature Conference 2026: निसर्गाशी नाते करा घट्ट! गोव्यात रंगणार पहिले निसर्ग संमेलन; तारीख, वेळ जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT