Diwali 2024: गोव्यातील 150 वर्षांहून जुनी सार्वजनिक लक्ष्मीपूजनाची परंपरा! वाचा कोंब-मडगाव येथील आगळावेगळा इतिहास

Comba Margao Laxmipujan: कोंब, मडगाव इथे दिवाळीच्या दिवशी किंवा सहसा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी येणारे लक्ष्मीपूजन सार्वजनिकरित्या साजरे करण्याची परंपरा आहे. ही परंपरा १५० वर्षांपेक्षा जुनी आहे.
Comba Margao Laxmipujan: कोंब, मडगाव इथे दिवाळीच्या दिवशी किंवा सहसा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी येणारे लक्ष्मीपूजन सार्वजनिकरित्या साजरे करण्याची परंपरा आहे. ही परंपरा १५० वर्षांपेक्षा जुनी आहे.
Laxmipujan In Margao Dainik Gomantak
Published on
Updated on

मंगेश बोरकर

कोंब, मडगाव इथे दिवाळीच्या दिवशी किंवा सहसा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी येणारे लक्ष्मीपूजन सार्वजनिकरित्या साजरे करण्याची परंपरा आहे. ही परंपरा १५० वर्षांपेक्षा जुनी आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी 3.30 वाजता लक्ष्मीची आकर्षक मूर्ती श्री दामोदर सालमधून बॅंड वादनासह वाजत गाजत श्री दामोदर विद्याभुवनात आणली गेली. स्थापनेनंतर श्री लक्ष्मीचे वास्तव्य तिथे तीन दिवस असते. सोमवारी सकाळी होणाऱ्या उत्तरपूजेनंतर बॅंड वादनाने वाजत गाजत तिची मूर्ती पुन्हा श्री दामोदर सालामधील स्वामी विवेकानंद दालनात आणून ठेवली जाईल. 

लक्ष्मीच्या मिरवणुकीच्या वेळी कोंबवाड्यावरील कुटुंबे आपल्या घरासमोर समई प्रज्वलित करतात. घरातील सौभाग्यवती ओवाळणी करून देवीची ओटी भरतात. काही लोक फळे अर्पण करतात.  तेथील नगरसेवक सगुण नायक यांनी या परंपरेबद्दल बोलताना सांगितले, ‘हे मडगावमधील सर्वात जुने सार्वजनिक लक्ष्मीपूजन आहे. हे पूजन कोंबवाड्यावरील लक्ष्मी सेवक उत्सव मंडळातर्फे केले जाते.

या मंडळात नायक, पाणंदीकर, कारे व इतर कुटुंबांचा सहभाग आहे. पूर्वीच्या काळी आमचे पूर्वज हे पूजन कोंबवाड्यावर असलेल्या एका धर्मशाळेत करत असत. १९१६ साली श्री विद्याभुवन ही वास्तु बांधण्यात आली. नंतरच्या काळात प्लेगची साथ पसरली, रस्त्यांचे बांधकाम झाले तेव्हा ही धर्मशाळा पाडली गेली. तेव्हापासून, म्हणजेच गेली १०८ वर्षे सार्वजनिक श्री लक्ष्मीपूजन श्री दामोदर विद्याभुवनातच संपन्न होते.’ एकेकाळी हे लक्ष्मीपूजन झाल्याशिवाय येथील कारे, पाणंदीकर, नायक या घराण्यातील व्यापारी आपल्या दुकानांवरील लक्ष्मीपूजनास सुरुवात करत नसत, असेही नायक यांनी सांगितले. 

Comba Margao Laxmipujan: कोंब, मडगाव इथे दिवाळीच्या दिवशी किंवा सहसा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी येणारे लक्ष्मीपूजन सार्वजनिकरित्या साजरे करण्याची परंपरा आहे. ही परंपरा १५० वर्षांपेक्षा जुनी आहे.
'Serendipity Arts Festival'मध्ये काय काय पाहाल? कार्यक्रमांची यादी, नोंदणीची माहिती घ्या एका क्लिकवर

पूर्वीच्या काळी श्री लक्ष्मीची मूर्ती घोडागाडीतून आणली जात असे. १९४०पासून सगुण नायक यांचे वडील विठ्ठल नायक यांनी पहिले वाहन खरेदी केले. तेव्हापासून आजपर्यत, गेली ८४ वर्षे नायक कुटुंबाच्या वाहनातून लक्ष्मी मूर्तीचे गमन-आगमन होत असते व ही परंपरा आता सगुण नायक यांनी देखील चालू ठेवली आहे. श्री लक्ष्मीची ही मूर्ती सोन्याची आहे असे अनेकजणांना वाटते. मात्र ती सोन्याची आहे की नाही याबद्दल नेमकी माहिती नाही. नायक यांच्या पूर्वजाच्या सांगण्यानुसार सोन्याचा लेप दिलेली ही मूर्ती असावी. मात्र तशी खात्रीलायक माहिती नाही. सुरवातीपासून आजपर्यंत, म्हणजे १५० वर्षांपेक्षा जास्त काळ ही एकच लक्ष्मीची मूर्ती आहे जिचे पूजन केले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com