Goa Mining Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: खाण ब्लॉकच्या ई-लिलावाची प्रक्रिया यशस्वी; शिरगावमध्ये आशेचा किरण

Goa Mining: स्थानिक कामगारांना पुन्हा सेवेत घ्यावे तसेच स्थानिक ट्रकांना काम मिळावे, या शिरगाववासीयांच्या प्रमुख मागण्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Mining: खाण ब्लॉकच्या ई-लिलावाची प्रक्रिया यशस्वी झाल्याने खाण व्यवसायाच्या समर्थनार्थ असलेल्या शिरगाव गावात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. आता खाण व्यवसाय सुरु होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाल्याने आर्थिक संकटात अडकलेल्या शिरगावमधील खाण अवलंबित घटकांना आशेचा किरण दिसू लागला आहे.

खाण ब्लॉक ई-लिलाव प्रक्रियेच्या गुरुवारी दुसऱ्या दिवशी 99.25 टक्के महसुलाची हमी देत साळगावकर शिपिंग कंपनीने शिरगावच्या खाणीची मालकी मिळविली आहे. खाणी सुरू करताना स्थानिक कामगारांना पुन्हा सेवेत घ्यावे तसेच स्थानिक ट्रकांना काम मिळावे, या शिरगाववासीयांच्या प्रमुख मागण्या आहेत.

ग्रामसभेतील ठराव

शिरगाव पंचायतीच्या गेल्या ग्रामसभेत खाण व्यवसाय सुरू करण्यास शिरगावच्या ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शविला आहे. खाणबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्यांना सावरण्यासाठी शिरगाव खाण ब्लॉकवरून मायनिंग सुरू व्हायलाच हवे, असा ठरावही एकमताने संमत केला आहे.

जयंत गावकर, उपसरपंच, शिरगाव-

खाण सुरू करताना स्थानिकांना नोकऱ्या आणि ट्रकांना काम तसेच गावच्या हिताच्या मागण्या संबंधित लिलावधारक कंपनीसमोर ठेवाव्यात, अशी मागणीही गेल्या ग्रामसभेत करण्यात आली आहे. या मागणीचा प्रस्ताव पंचायतीतर्फे साळगावकर कंपनीला देण्यात येणार आहे.

विश्वंबर गावकर, अध्यक्ष, ट्रकमालक संघटना-

खाणी बंद झाल्यापासून ट्रकमालक आर्थिक संकटात आले आहेत. शिरगाव खाणीवरील जवळपास दीडशे ट्रक बंद आहेत. या ट्रकांना पुन्हा काम मिळायला हवे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: बेपत्ता राजवीर सापडला; काणका पर्रा येथे लागला शोध

Saint Xavier Exposition: मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूताने घेतले संत फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाचे दर्शन; गोव्याचे केले विशेष कौतुक

Cash For Job: संशयितांच्या मालमत्तेची चौकशी करा! पोलिसांची शिफारस; कोट्यवधींची अफ़रातफर उलगडणार?

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT