Ajit Aparajit Vessels Goa Shipyard Dainik Gomantak
गोवा

Goa Shipyard: अभिमान! सागरी सुरक्षेला नवी धार, गोवा शिपयार्डकडून ‘अजित’, ‘अपराजित’ गस्‍ती जहाजांचे जलावतरण

Ajit Aparajit Vessels: गोवा शिपयार्डने भारतीय तटरक्षक दलासाठी बांधलेल्या ‘अजित’ व ‘अपराजित’ या द्रुतगती गस्ती जहाजांचे जलावतरण नुकतेच एका भव्य सोहळ्यात मंजू शर्मा यांच्या हस्ते करण्‍यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: गोवा शिपयार्डने भारतीय तटरक्षक दलासाठी बांधलेल्या ‘अजित’ व ‘अपराजित’ या द्रुतगती गस्ती जहाजांचे जलावतरण नुकतेच एका भव्य सोहळ्यात मंजू शर्मा यांच्या हस्ते करण्‍यात आले.

‘आत्मनिर्भर भारत’ अभियानांतर्गत गोवा शिपयार्डने भारतीय तटरक्षक दलासाठी तयार केलेल्या आठ जहाजांच्या मालिकेतील ही सातवी व आठवी जहाजे असून, संरक्षण उत्पादनातील भारताच्या वाढत्या स्वावलंबनाचे हे उदाहरण आहे.

या सोहळ्याला संरक्षण सेवेत कार्यरत आर्थिक सल्लागार मयंक शर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय, गोवा तटरक्षक दलाचे महानिरीक्षक भीष्म शर्मा, गोवा विभागाचे प्रमुख मनोज भाटिया यांच्यासह भारतीय तटरक्षक दल, नौदल आणि शिपयार्डचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मयंक शर्मा यांनी गोवा शिपयार्डच्या कामगिरीचे कौतुक केले. ब्रजेश कुमार उपाध्याय यांनी शिपयार्डच्या प्रगतीचा आढावा घेत सांगितले की, गोवा शिपयार्डचा प्रगती आलेख सातत्याने उंचावत असून, ‘मेक इन इंडिया’च्या दृष्‍टिकोनाशी सुसंगत अशी वाटचाल सुरू आहे.

जहाजांची वैशिष्ट्ये

नाव : ‘अजित’ व ‘अपराजित’

लांबी : ५२ मीटर

विस्थापन : ३२० टन

विशेषता : कंट्रोलेबल पिच प्रोपेलर्स, उच्च गती

कार्यक्षेत्र : किनारी संरक्षण, तस्करी व चाचेगिरीविरोधी कारवाया. शोध व बचाव मोहिमा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tiger Reserve Controversy: 'काही वाघ फिरतायेत म्हणून व्याघ्र प्रकल्प घोषित करता येत नाही', गोवा सरकारचे सर्वोच्च न्यायालयाच्या समितीला उत्तर

Election Commission: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! बिहारनंतर आता देशातील 12 राज्यांमध्ये होणार 'एसआयआर'

Goa Politics: "एकटा लढेन, मागे फिरणार नाही",पक्ष तिकीट न मिळाल्यास 'स्वतंत्र' लढणार; डॉ. केतन भाटीकर यांची मोठी घोषणा

Shreyas Iyer: दुखापतीमुळे चिंता वाढली: श्रेयस अय्यरला ICU मध्ये हलवलं; कुटुंबाला सिडनीला नेण्याची तयारी सुरू

Pakistan Afghan Tension: पाकिस्तानात मोठी चकमक! 4 आत्मघाती हल्लेखोरांसह 25 दहशतवादी ठार, पाक-अफगाण सीमेवर पुन्हा तणाव; स्फोटकांचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT