Goa Shipyard to deliver first boat to Army for patrolling 
गोवा

चीनच्या कुरापतींवर लक्ष ठेवण्यासाठी गोवा शिपयार्ड गस्ती नौका तैनात करणार

दैनिक गोमंतक

पणजी : कुरापतखोर चीनच्या (China) लष्करी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय लष्कराने (Indian Army) आता नवतला प्रमाणेच गस्ती नौका बांधून घेणे सुरू केले आहे. गोव्यातील गोवा शिपयार्ड (Goa Shipyard) या सार्वजनिक क्षेत्रातील जहाजबांधणी कंपनीत (shipbuilding company) हे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या गस्ती नौका भारत-चीन सीमेवरील सरोवरांत लष्कर तैनात करणार आहे. (Goa Shipyard to deliver first boat to Army for patrolling)

भारतीय लष्करासाठी 12 अत्याधुनिक गस्ती नौका बनवण्याचे काम सार्वजनिक क्षेत्रातील जहाजबांधणीत अग्रगण्य असलेल्या गोवा शिपयार्डमध्ये युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोना संकट काळातही गोवा शिपयार्डचे व्यवस्थापन, अधिकारी आणि कर्मचारी या प्रकल्पासाठी प्राधान्याने काम करत आहेत. सध्या हे काम प्रगतीपथावर असून पहिल्या गस्ती नौकेचं काम जुलै महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती गोवा शिपयार्डचे जनसंपर्क अधिकारी निखिल वाघ यांनी दिली. 

या गस्ती नौकांमुळे भारतीय लष्कराला लडाख तथा इतर भागात विशेष मोहिमांमध्ये मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. एका गस्ती नौकेमध्ये एक प्लाटून म्हणजेच अंदाजे 30 भारतीय लष्कराचे जवान मोहिमेवर जाऊ शकतील.  गेल्यावर्षी गलवान भागात भारतीय लष्कराचे जवान आणि चीनच्या सैनिकांमध्ये मोठी चकमक झाली होती. त्यानंतर  लडाख भागात चीन सैनिकांच्या वाढत्या कारवायांवर नजर ठेवण्यासाठी आणि विशेषत: भारताच्या हद्दीत दुर्गम प्रदेशात असणार्या सरोवर आणि खाडीमध्ये गस्त घालण्याकरिता भारतीय लष्कराने गस्ती नौका बनवण्याचा निर्णय घेतला होता. ज्यापैकी 12 गस्ती नौका बनवण्याचं कंत्राट भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत काम करणार्या गोवा शिपयार्डला मिळालं आहे. दिल्लीमध्ये 31 डिसेंबर 2020 रोजी गोवा शिपयार्डचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कमोडोर बी बी नागपाल यांच्या उपस्थितीत गोवा शिपयार्ड आणि भारतीय लष्कराच्या प्रतिनिधिंनी करारावर स्वाक्षर्या केल्या. 

सार्वजनिक क्षेत्रातील जहाजबांधणीत अग्रगण्य असलेल्या गोवा शिपयार्डला प्रथमच भारतीय लष्करासाठी नौका बांधण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी गोवा शिपयार्डने अनेक अत्याधुनिक आणि उत्तम दर्जांची अनेक जहाजं भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल तसेच काही मित्र देशांच्या संरक्षण दलासाठीदेखील तयार केली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Auction 2027: आयपीएलमध्ये 40 कोटींची बोली लागणार? 'या' 3 खेळाडूंवर फ्रँचायझींची नजर; अभिषेक, बुमराहलाही मिळू शकते मोठी रक्कम!

Ducati ची दमदार अ‍ॅडव्हेंचर बाईक भारतात येणार! बुकिंग सुरू, 890cc इंजिनसह मिळणार भन्नाट फीचर्स; Royal Enfield-KTM ला देणार टक्कर, किंमत किती?

डिचोलीत दिवाळीचा उत्साह शिगेला! नरकासुर प्रतिमांनी वेधलं लक्ष; बाजारपेठेत खरेदीसाठी प्रचंड गर्दी

Indian Super League: 'आयएसएल' पंचगिरीबाबत FC Goa नाराज, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडे लेखी तक्रार; तीव्र चिंता व्यक्त

Viral Video: ट्रेनमध्ये चोरी करायला गेला अन् स्वतःच अडकला! खिडकीतून हात घालताच प्रवाशांनी चोराला पकडलं; 94 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT