Vijay Sardesai Dainik Gomantak
गोवा

Goa Shigmotsav : शिमग्यातील वेळेचे बंधन काढा! विजय सरदेसाई यांचे मुख्‍य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र

Goa Shigmotsav : २६ मार्च रोजी फोंडा येथे जी चित्ररथ मिरवणूक काढण्‍यात आली होती, ती मिरवणूक रात्री १० वाजता बंद करण्‍यात आली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Shigmotsav :

मडगाव, सध्‍या गाेव्‍यात शिमग्याचा उत्‍सव चालू असून शिमगा हा सर्वसामान्‍य गोवेकरांचा सण आहे. त्‍यामुळे या शिमग्याच्‍या मिरवणुका आयोजित करण्‍यात वेळेचे बंधन घालण्‍यात येऊ नये, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी मुख्‍य निवडणूक अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

२६ मार्च रोजी फोंडा येथे जी चित्ररथ मिरवणूक काढण्‍यात आली होती, ती मिरवणूक रात्री १० वाजता बंद करण्‍यात आली होती.

त्‍यामुळे स्‍पर्धकांमध्‍ये निराशा पसरलीच शिवाय शिमग्याचा सण मनसोक्‍तरीत्‍या साजरा करण्‍याची भावनाही लुप्‍त पावली, याकडे सरदेसाई यांनी लक्ष वेधले आहे. या शिमग्यासाठी लोक महिनोन्‌महिने तयारी करतात.

जर वेळेच्‍या बंधनामुळे त्‍यांना मिरवणुकीत भाग घेता येत नसेल तर त्‍यांच्‍यावर एकप्रकारे अन्‍याय झाल्‍यासारखे होईल, असे सरदेसाई यांनी आपल्‍या पत्रात म्‍हटले आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने शिमग्याच्‍या मिरवणुकीवर घातलेले वेळेचे बंधन काढून टाकावे, अशी मागणी त्‍यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Consumer Commission: मुदतवाढ नाकारल्याने दक्षिण गोवा ग्राहक आयोगाचे माजी अध्यक्ष कोर्टात! 'अन्याय’ झाल्याचा केला दावा

Teachers Pending Salary: 458 शिक्षक-कर्मचाऱ्यांचा थकीत पगार कधी मिळणार? सरदेसाईंचं मुख्य सचिवांना पत्र; तात्काळ वेतनाची केली मागणी

Curchorem Drug Capital Goa: कुडचडे गोव्याचं 'ड्रग कॅपिटल'? अमित पाटकरांचा सरकारवर हल्लाबोल; अमली पदार्थांविरोधात निर्णायक कारवाईची केली मागणी

Viral Video: भरधाव राजधानी एक्सप्रेस अन् समोर हत्तींचा कळप! देवदूत बनून आला वन रक्षक; थोडक्यात काळाचा घाला टळला

ISRO Space Sector Reforms: 'इस्रो'चं खासगीकरण नाही, तर जबाबदारीचं नव्यानं वाटप! 2020 नंतर स्पेस इकॉनॉमीला वेग; नव्या अवकाश धोरणानं बदलली भारताची दिशा

SCROLL FOR NEXT