Goa Shigmotsav 2024  Dainik Gomantak
गोवा

Goa Shigmotsav 2024 : साखळी येथे २८ रोजी शिगमोत्सव शोभायात्रा, भरघोस बक्षिसे

Goa Shigmotsav 2024 : २७ रोजी उद्‍घाटन : मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा व ‘गरजतो मराठा’ सांस्कृतिक कार्यक्रम

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Shigmotsav 2024 :

साखळी, राज्यातील प्रमुख शहरात पर्यटन खाते भरवत असलेल्या शिगमोत्सव शोभायात्रांना राज्यात सुरवात झाली आहे.

२८ रोजी साखळी शहरात शिगमोत्सव शोभायात्रा होणार असून उद्‍घाटन सोहळा २७ रोजी संध्या. ४ वा. सरकारी सामाजिक आयोग केंद्राजवळ खास उभारण्यात येणाऱ्या व्यासपीठावर होणार आहे.

साखळी नगरपालिका व साखळी शिमगोत्सव समितीच्या सहकार्याने पर्यटन खात्याने आयोजित केलेल्या या शोभायात्रेत राज्यातील चित्ररथ, रोमटामेळ, लोककला पथके आदी सहभागी होतील, अशी माहिती आयोजन समितीचे प्रमुख तथा मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

२७ रोजी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून लोककला कलाकार झिलू गावकर, हेल्थव्हेचे वरिष्ठ डॉ. मधुमोहन देसाई, मुख्याधिकारी कबीर शिरगावकर आदींची उपस्थिती असेल. त्यानंतर अखिल गोवा पातळीवर ८ ते १४ या वयोगटातील मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा घेतली जाईल.

स्पर्धेनंतर "गरजतो मराठा" हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. २८ रोजी संध्या. ४ वा. उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गिते व पोलिस उपअधिक्षक विश्वेश कर्पे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शोभायात्रेला सुरवात होणार आहे. या शोभायात्रेत सहभागी होणारे चित्ररथ, रोमटामेळ, लोककला पथक तसेच वेषभूषा कलाकारांचे परिक्षण करून त्यांना बक्षीसे देण्यात येणार आहेत.

संध्या. ५ वाजेपर्यंत येणाऱ्या स्पर्धकांनाच शोभायात्रेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्यानंतर येणाऱ्या स्पर्धकांना प्रवेश नाकारला जाणार आहे, असेही मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांनी सांगितले.

विविध स्पर्धा

राज्यस्तरीय चित्ररथ स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम रू. ४५ हजार, द्वितीय रू. ३० हजार, तृतीय रू. २५ हजार, चौथे रू. २० हजार, पाचवे रू. १५ हजार, तर रू. ५ हजारांची २० उत्तेजनार्थ बक्षीसे दिली जाईल. रोमटामेळ स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम रू. ३५ हजार, द्वितीय रू. २० हजार, तृतीय रू. १५ हजार, चौथे रू. १० हजार, पाचवे रू. ९ हजार, तर रू. ५ हजारांची ६ बक्षीसे दिली जाईल.

लोककला स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम रू. १७ हजार, द्वितीय रू. १२५००/- तृतीय रू. १० हजार, चौथे रू. ८ हजार, पाचवे रू. ५ हजार तर रू. ४ हजारांची १० उत्तेजनार्थ बक्षीसे दिली जाईल.

खुला गट वेशभूषा स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम रू. ४ हजार, द्वितीय रू. ३ हजार, तृतीय रू. २ हजार. ८ ते १४ वयोगटातील वेशभूषा स्पर्धेच्या विजेत्यांना प्रथम रू. १२००/-, द्वितीय रू. १०००/- व तृतीय रू. १५००/- अशी बक्षीसे दिली जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT