Goa Shack Policy Dainik Gomantak
गोवा

Goa Shack Policy: शॅक धोरणाला मुदतवाढ देण्याची याचिका हायकोर्टानं फेटाळली, सरकारचा फायनल निर्णय नाही

Goa Shack Policy Extension Petition: राज्य सरकारच्या किनारी शॅक धोरणाला मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावित निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळून लावली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्य सरकारच्या किनारी शॅक धोरणाला मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावित निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळून लावली आहे. सरकारने या धोरणाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नसल्यामुळे ही याचिका ‘वेळेआधी’ (अकाली) दाखल करण्यात आल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

सुनावणीदरम्यान, राज्य सरकारच्या वकिलांनी स्पष्ट केले की, सन २०२६-२७ या वर्षांसाठी शॅक धोरणाला मुदतवाढ देण्याचा विषय सध्या सरकारदारी विचाराधीन आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत वा अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. या स्पष्टीकरणानंतर, सध्याच्या टप्प्यावर याचिकेला कायदेशीर आधार उरलेला नाही, असे नमूद करत याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी याचिका मागे घेण्याची परवानगी मागितली.

भविष्यात सरकारने जर कोणताही प्रतिकूल निर्णय घेतला व त्यातून संघर्षाचे कारण निर्माण झाले, तर नव्याने याचिका दाखल करण्याची मुभा द्यावी, अशी विनंतीही वकिलांनी केली. न्यायालयाने हे मान्य करत ही याचिका अकाली आणि सुनावणीयोग्य नसल्याचे स्पष्ट करत ती फेटाळून लावली. तसेच, प्रशासनाकडून अंतिम निर्णय घेतला गेल्यास याचिकाकर्त्यांना पुन्हा न्यायालयात दाद मागण्याचे स्वातंत्र्य बहाल केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar 2026: व्यवसाय, नोकरी अन् बँक बॅलन्स..! मंगळाचे नक्षत्रांतर 'या' राशींसाठी ठरणार वरदान; होणार अफाट धनलाभ

Goa Ganeshotsav: गोव्यात 77 हजार गणेशमूर्तींची नोंद; तब्बल 22,886 मूर्तींमध्ये 'POP', पर्यावरण खात्याच्या पोर्टलवरील आकडेवारी समोर

Bengaluru Crime: 24 वर्षांचा आनंद अवघ्या 4 महिन्यात विरला, पोटच्या जुळ्या मुलींची आईनेच केली हत्या; बंगळुरुतील घटनेनं हादरला देश

Goa Law And Order: आकड्यांचा सलाम!

Goans Surrender Passports: रोज सरासरी 5 गोमंतकीय पासपोर्ट करतात सरेंडर; 3.5 वर्षांत तब्बल 6,960 जणांनी पासपोर्ट सोडला

SCROLL FOR NEXT