Goa Beach shack  Dainik Gomantak
गोवा

Goa Beach Shack: पावसाने पाणी किनाऱ्यांवर चढू लागले, शॅक मालकांकडून मुदतवाढीचा अर्ज मागे; फटका बसल्याचे मान्य

Goa Tourism: पावसामुळे शॅक व्यवसाय मुदतवाढीसाठी पर्यटन विभागाकडे केलेला अर्ज संघटनेने मागे घेतल्याची माहिती अखिल गोवा शॅक मालक संघटनेचे अध्यक्ष क्रूझ कार्दोज यांनी दिली.

Sameer Panditrao

पणजी: गोव्याच्या किनारपट्ट्यांवर चालणाऱ्या शॅक व्यवसायाला अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला असून पर्यटन हंगाम संपण्याआधीच व्यवसाय थांबवावा लागल्याने शॅक मालकांत निराशा पसरली आहे.

दरम्यान, पावसामुळे शॅक व्यवसाय मुदतवाढीसाठी पर्यटन विभागाकडे केलेला अर्ज संघटनेने मागे घेतल्याची माहिती अखिल गोवा शॅक मालक संघटनेचे अध्यक्ष क्रूझ कार्दोज यांनी दिली.

सुरवातीला आम्ही पर्यटन संचालकांना अर्ज करून ३१ मेनंतर शॅक व्यवसायासाठी मुदतवाढ मागितली होती. आमची मागणी होती की, परवाना १० जूनपर्यंत वाढवावा. मात्र नंतर हवामान बदलाचे संकेत लक्षात घेऊन आम्ही स्वतःच तो अर्ज मागे घेतला, असे कार्दोज यांनी स्पष्ट केले.

कार्दोज यांनी स्पष्ट केले

कार्दोज यांनी सांगितले की, १५ मेनंतर देशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर गोव्यात येऊ लागले होते. बागा, कळंगुट, कोलवा आणि बाणावली परिसरातील काही शॅक मालकांनी मुदतवाढीची विनंती केली होती, पण नंतर त्यांच्याच सांगण्यानुसार संघटनेकडून ही मागणी मागे घेण्यात आली. पावसाचे पाणी किनाऱ्यांवर चढू लागल्याने हा निर्णय घेण्यात आला.

५० टक्केच पर्यटक

पर्यटकांच्या संख्येबाबत सरकारचा अहवाल बरोबर असला तरी शॅक व्यवसायावर परिणाम झाल्याचे त्यांनी मान्य केले. ते म्हणाले की, सुमारे ५० टक्के पर्यटक शॅकमध्ये जातात आणि उरलेले समुद्रकिनाऱ्यावर थेट बसतात. त्यामुळे आम्हाला अपेक्षित व्यवसाय मिळाला नाही.

शॅक भाड्याने देण्यास विरोध

हरमल परिसरात शॅक भाड्याने देण्याच्या प्रकारांबाबत संघटना सजग आहे. गोमंतकीयांना शॅक दिल्यास आमची हरकत नाही, पण बिगर गोमंतकीयांना शॅक भाड्याने दिल्यास आम्ही त्याला विरोध करणार असेही कार्दोज यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT