Court Dainik Gomantak
गोवा

Goa Sextortion Case: संशयित कुकेशा राऊताच्या जामीनाविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली; अधिकाऱ्यांना बजावली नोटीस

Court Denies Plea in Sextortion Case: सेक्स्टॉर्शन तक्रार प्रकरणात अटकेत असलेल्या संशयित कुकेश याच्या जामिनाला विरोध करणारी हळदोणेतील एका मतदाराची हस्तक्षेप याचिका म्हापसा न्यायालयाने फेटाळली.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: काँग्रेस आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी दाखल केलेल्या सेक्स्टॉर्शन तक्रार प्रकरणात अटकेत असलेल्या संशयित कुकेश याच्या जामिनाला विरोध करणारी हळदोणेतील एका मतदाराची हस्तक्षेप याचिका म्हापसा न्यायालयाने फेटाळली.

तर कुकेश याच्या जामिनावरील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने (Court) जामिनावरील निवाडा गुरुवारी (ता.१२) राखून ठेवला आहे. त्याचप्रमाणे, याप्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांना गुरुवारी सुनावणीवेळी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्यासंदर्भात न्यायालयाने नोटीस जारी केली आहे.

बुधवारी (ता.११) म्हापसा जीएमएफसी कोर्टात झालेल्या सुनावणीवेळी सुरुवातीलाच कोर्टाने याप्रकरणातील हळदोणे मतदारसंघातील एका मतदाराने दाखल केलेली हस्तक्षेप याचिका फेटाळली. त्यानंतर फिर्यादी पक्षाचे सरकारी वकील अ‍ॅड. तेजस पवार व बचाव पक्षाचे अ‍ॅड. कपिल केरकर यांनी जामीन अर्जावर युक्तिवाद केला. यावेळी दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी जामिनावर आदेश गुरुवारी (ता.१२) राखून ठेवला आहे.

‘एसओपीं’च्या उल्लंघनाचा दावा

क्राईम ब्रँचने सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन करीत, संशयितास सीआरपीएसच्या ४१(अ) अंतर्गत नोटीस देण्यापूर्वीच अटक केली. हे प्रकरण एक वर्षापूर्वी घडले होते आणि आता तक्रार देण्यात आली आहे. अशावेळी माझ्या अशिलाला अटक करण्याची गरज नव्हती. तरीही सर्वोच्च न्यायालयाच्या एसओपींचे उल्लंघन करीत, पोलिसांनी अशिलाला अटक केल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. केरकर यांनी केला.

यावर सरकारी पक्षाचे वकील म्हणाले की, हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. फिर्यादी हे लोकप्रतिनिधी तसेच प्रसिद्ध व्यक्ती आहेत. याशिवाय संशयिताने फिर्यादीकडून खंडणी मागितली आहे. पोलिसांनी संशयिताकडून मोबाईल जप्त केला आहे. अशावेळी संशयिताला जामीन दिल्यास तपासात अडथळा निर्माण होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT