CM Pramod sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: उंडीर मलनिस्सारण प्रकल्‍पाबाबत मुख्‍यमंत्र्यांनी दिली गोंयकार’ कार्यक्रमात महत्वाची माहिती, वाचा..

मुख्‍यमंत्री सावंत : चर्चेसाठी ग्रामस्‍थांना दोन दिवसांत देणार वेळ

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant उंडीर येथील मलनिस्सारण प्रकल्पासंदर्भात चर्चेसाठी ग्रामस्‍थांना दोन दिवसांत वेळ देईन. या प्रकल्पासाठी पूर्वीच भू-संपादन झाले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनीही म्हणणे जाणून घेतले आहे. हा प्रकल्प झाला पाहिजे.

मलजलावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया झाली तर भूजलाची प्रत चांगली राहण्यास मदत होणार आहे. 4 हजार चौरस मीटर जमिनीत प्रकल्प झाला पाहिजे, असे मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनी स्‍पष्‍ट केले. दूरदर्शनवरील ‘हॅलो गोंयकार’ कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी ही माहिती दिली.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी पायाभूत सुविधा तयार केल्या होत्या. आता त्यांची दुरुस्ती करणे, रंगरंगोटी करणे आवश्यक बनले आहे. सध्‍या ती कामे जोरात सुरू आहेत. सप्टेंबरमध्ये ती कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

त्याबरोबरीने आयोजनासाठी अनेक निविदा मागवाव्या लागणार आहेत, त्याचे कामही सुरू आहे. १० ऑक्टोबरपर्यंत कंत्राटदार कंपन्या ही कामे सुरू करतील, अशी अपेक्षा आहे. नियोजनाच्या पातळीवरही कामे करण्यात येत आहेत. त्याचा वेळच्यावेळी आढावाही घेतला जात आहे.

२५ किंवा २६ ऑक्टोबर रोजी या स्पर्धेचे उद्‍घाटन केले जाईल. राज्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा बघण्याची संधी जनतेसोबत विद्यार्थ्यानाही मिळणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्‍यमंत्र्यांचे मुद्दे...

जी-२० बैठकांमुळे गोवा जगाच्या नकाशावर

पर्यटनातील गोवा जाहीरनामा राज्याला फायदेशीर

दोडामार्ग-म्हापसा बससेवा लवकरच

‘कौशल्य विकास’साठी नऊ हजार जणांना संधी

प्रादेशिक आराखडा : आक्षेप असल्यास नोंदवा

गुन्हे उकल होण्याचे प्रमाण वाढल्याने नोंद वाढली

परप्रांतीय कामगारांची नोंदणी सक्तीची

किनारी भागातील ध्वनिप्रदूषण रोखणार

अबकारी परीक्षेचा निकाल जाहीर करणार

विकसित गोवा २०४७ दस्तावेज तयार करणार

मुद्रांक शुल्‍कात महिलांना सूट देणार!

मालमत्ता विक्री करार आणि विक्री खत करतेवेळी असे मिळून दोन वेळा मुद्रांक शुल्क भरावे लागते. ते एकाचवेळी भरून दुसऱ्यावेळी नाममात्र शुल्क आकारणी करण्यासाठी कायद्यात दुरुस्तीचा विचार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नावर सांगितले.

महिलांनी मालमत्ता घेतली तर त्यांना मुद्रांक शुल्कात सवलत देण्याविषयी विचार करता येईल, असे मुख्यमंत्रा डॉ. प्रमोद सावंत म्हमाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT