Goa Election 2022 Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: गोव्यात घडला भारतातील एक राजकीय विक्रम

हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासात एक अनोखा विक्रम आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा: आगामी काळात गोव्यासह चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पाश्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. मागील काही दिवसांपासून गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा पणजी विधानसभा मतदार संघ चर्चेत आला आहे.

(Goa set a political record in India)

या जागेवरुन माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना तिकीट नाकारण्यात आले आहे. त्यामुळे गोव्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागले आहेत. याच पाश्वभूमीवर 40 सदस्यीय विधानसभेच्या (Goa Assembly Election) एकूण संख्याबळाच्या 60 टक्के असलेल्या गोव्यातील किमान 24 आमदारांनी गेल्या पाच वर्षांत पक्ष बदलला, हा भारतातील एक विक्रम आहे. एडीआरच्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, गोव्यातील पक्षांतर करणाऱ्या नेत्यांनी एक अनोखा विक्रम केला आहे, जो भारतीय लोकशाहीच्या इतिहासात अतुलनीय आहे.

आगामी काळात गोव्यासह (Goa) चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पाश्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. मागील काही दिवसांपासून गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा पणजी विधानसभा मतदार संघ चर्चेत आला आहे. या जागेवरुन माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांना तिकीट नाकारण्यात आले आहे. त्यामुळे गोव्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागले आहेत. याच पाश्वभूमीवर

अहवालात तीन नेत्यांच्या नावांचा समावेश नाही.

अहवालात असे म्हटले आहे की 24 आमदारांच्या यादीत विश्वजित राणे, सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांच्या नावांचा समावेश मात्र नाही, ज्यांनी 2017 मध्ये काँग्रेस आमदारपदाचा राजीनामा दिला होता. आणि आत्ता सत्ताधारी भारतीय जनता पक्षापूर्वी त्यांच्या तिकिटावर निवडणूक लढवून पक्षात (BJP) सामील झाले होते. 2019 मध्ये काँग्रेसचे दहा आमदार भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यात तत्कालीन विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर (क्यूपेम मतदारसंघ) यांचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: डिस्को लाईट्स अन् 'विरुष्का'चा नादखुळा डान्स! आरसीबीच्या बॅक-टू-बॅक विजयाचं तगडं सेलिब्रेशन; रोमँटिक व्हिडिओ व्हायरल

Goa Pink Taxi: पिंक रिक्षानंतर आता महिलांसाठी 'पिंक टॅक्‍सी'; सहकार खाते प्रयत्‍नशील, बँकांशी सकारात्मक चर्चा

Goa Road Accident: 'थार'की मृत्युचा सापळा? आठवड्यात तिघांचा बळी, पाच महिन्यांत 101 रस्ते अपघाती मृत्यू

अय्‍यांनी खडक फोडून आणले पाणी; देशभरात गाजली जिद्दीची कहाणी! 'मन की बात'मध्‍ये पंतप्रधान मोदी यांच्याकडून कौतुक

इराणचा कुवेतवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा भीषण मारा; प्रत्युत्तरात अमेरिकेचे 'सेल्फ-डिफेन्स' हल्ले तर इस्रायलकडून हिजबुल्लाहवर बॉम्बवर्षाव

SCROLL FOR NEXT