Goa Sessions Court Dainik Gomantak
गोवा

Goa Sessions Court: कनिष्ठ न्यायालयाचा 'तो' निर्णय तर्कहीन; कारावासाची शिक्षा केली रद्द, रवींद्रनाथ गावकर दोषमुक्त

Goa Sessions Court Verdict: दोन्ही पक्षांमध्ये वडिलोपार्जित जमिनीवरून जुना दिवाणी वाद सुरू आहे

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: म्हापसा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने कौटुंबिक मालमत्ता वादाच्या एका प्रकरणात दिलेला निकाल अत्यंत सदोष, घाईघाईचा आणि पुराव्यांशी विसंगत असल्याचा निष्कर्ष नोंदवत मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने रवींद्रनाथ नाईक गावकर (६२, कामुर्ली) याला सुनावलेली शिक्षा रद्द केली आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश आरतीकुमारी नाईक यांनी कनिष्ठ न्यायालयाचा २६ मार्च २०२५ चा निकाल बाजूला ठेवताना, कनिष्ठ न्यायालयाने पुराव्यांकडे आणि गंभीर त्रुटींकडे पूर्णपणे डोळेझाक केल्याचे आपल्या आदेशात अधोरेखित केले आहे. ज्या वैद्यकीय पुराव्यांचा आधार घेतला, त्यात गंभीर घोळ होता, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

सत्र न्यायालयाने म्हटले...

या घटनेनंतर तब्बल २ महिने २८ दिवसांनी एफआयआर नोंदवला गेला. हा विलंब संशयास्पद असताना आणि सरकारी पक्षाला याचे समाधानकारक कारण देता आले नसतानाही, कनिष्ठ न्यायालयाने गावकरला दोषी धरले, जे कायद्याच्या चौकटीत बसणारे नाही.

दोन्ही पक्षांमध्ये वडिलोपार्जित जमिनीवरून जुना दिवाणी वाद सुरू आहे. अशा वेळी सूडबुद्धीने तक्रार दाखल होण्याची शक्यता अधिक असल्याने पुराव्यांची काळजीपूर्वक तपासणी करणे आवश्यक होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

SCROLL FOR NEXT