Goa Sesa Workers Dainik Gomantak
गोवा

Goa Sesa Workers : पूर्वाश्रमीच्या कामगारांवर अन्याय करू नका ; शेतकऱ्यांचा सेझा कामगारांना पाठिंबा

किसान सभेत मागणी ; कामगारांसह स्थानिकांवर अन्याय खपवून घेणार नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

वेदांता कंपनीने कामगार कपात केल्याने गलितगात्र बनलेल्या डिचोलीतील पूर्वाश्रमीच्या सेझा कामगारांना आता अखिल भारतीय किसान सभेसह मयेतील शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.

कामगारांचा प्रश्न सुटेपर्यंत आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे, असे धीर देणारे आश्वासन किसान सभेसह अन्य शेतकरी संघटनांनी अस्वस्थ कामगारांना दिले आहे. हातांना काम मिळावे म्हणून कपात केलेले पूर्वाश्रमीचे सेझाचे कामगार संघर्ष करीत आहेत.

खाणपट्ट्यातील पंचायतींसह शेतकरी संघटनांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ते धडपडत आहेत. खाण व्यवसायामुळे स्थानिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते.

खाण व्यावसायिकांना तर कामगारांसह शेतकऱ्यांचे काहीच पडलेले नाही, अशी खंत किसान सभेचे अध्यक्ष कृष्णा गडेकर यांनी व्यक्त केली. पूर्वाश्रमीच्या कामगारांना कामावर घेत नसाल, तर खाण व्यवसाय काय कामाचा? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, मये भू-विमोचन नागरिक कृती समितीचे अध्यक्ष आणि शेतकरी संघटनेचे सखाराम पेडणेकर यांनीही सेझाच्या कामगारांना पाठिंबा दिला आहे.

कामगारांसह स्थानिकांवर अन्याय खपवून घेणार नाही. पर्यावरण सांभाळले नाही, तर आमचा खाण व्यवसायाला विरोध असेल अशी भूमिका त्यांनी कामगारांसमोर मांडली.

किसान सभेकडून पाठिंबा

कामगार संघटनेचे अध्यक्ष नीलेश कारबोटकर, किशोर लोकरे, नारायण गावकर, दीपक पोपकर, बाबुसो कारबोटकर, अनिल सालेलकर आदी पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील कामगारांनी आज मये येथे जाऊन अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कृष्णा गडेकर, स्वयंम कामत, राजन नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कामगारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर कृष्णा गडेकर यांच्यासह स्वयंम कामत राजन नाईक आदींनी कामगारांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: गोव्याचं पर्यटन संपलं नाही वाढलं! पर्यटन मंत्र्यांनी थेट आकडेवारीच दिली, सोशल मीडियावरील दावे काढले खोडून

Goa Today's News Live: 'फोंड्याची उमेदवारी कुणाला द्यायची याचा निर्णय पक्ष घेईल, मी नाही'; CM सावंत

Karvi Flowers: श्री गणेशाने हत्तीचे रूप घेतले, मुरुगन आणि वल्लीचे लग्न झाले; गोव्यात फुलणाऱ्या 'कारवी'चे महत्व

ड्रग्ज का दारुची नशा? झिंगलेल्या रशियन महिलेचा शिवोलीत भररस्त्यात राडा, वाहनं अडवली, पोलिसांशी घातली हुज्जत

Goa Rain: तुळशीच्या लग्नाला 'पावसाच्या' अक्षता? शेतकरी हवालदिल; ‘व्हडली दिवाळी’वर पावसाचे सावट

SCROLL FOR NEXT