Cyber Fraud Dainik Gomantak
गोवा

Cyber Fraud: गोव्यात ज्येष्ठ नागरिकाला 2.83 लाखांचा गंडा; भीती दाखवून बँक खात्यातून रक्कम लंपास, सायबर क्राईम पोलिस ठाण्यात FIR दाखल

Goa Senior Citizen Cyber Fraud: भीती दाखवून आणि दिशाभूल करून बार्देश तालुक्यातील पर्रा येथील एका ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून २ लाख ८३ हजार ९५६ रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: भीती दाखवून आणि दिशाभूल करून बार्देश तालुक्यातील पर्रा येथील एका ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून २ लाख ८३ हजार ९५६ रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पर्रा येथील रहिवासी जाओ फर्नांडिस (५९) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.२६ वाजता एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला. संबंधित व्यक्तीने भीती दाखवून तसेच खोटी माहिती देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तक्रारदाराच्या बँक खात्यातून अनधिकृत व्यवहार करून एकूण २ लाख ८३ हजार ९५६ रुपये काढून घेतले.

तपास म्हापसा पोलिसांकडे वर्ग

या प्रकरणी सायबर क्राईम पोलीस ठाण्यात प्राथमिक प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास म्हापसा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. त्यानुसार, ८ ऑक्टोबर २०२६ रोजी म्हापसा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३१८ अन्वये फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navratri Wishes In Marathi: नऊ दिवस, नऊ रंग अन् देवीच्या भक्तीचा सोहळा! शारदीय नवरात्रीनिमित्त WhatsApp स्टेटस, Facebook पोस्टसाठी खास मराठमोळ्या शुभेच्छा

Crime News: गोपाळ नाईक हाच सूत्रधार की पडद्यामागे आणखी कोणी? श्रीनिवास नायक गोळीबारप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू

Viral Video: "तो आमचा हिरो''! स्मित मच्छार यांच्यासाठी इस्त्रायली गायकानं गायली हनुमान चालीसा; यूजर्स म्हणाले, 'अंगावर शहारे आले...'

Indian Super League: घरच्या मैदानावर विजयाचे लक्ष्य! गौरमांगी सिंग यांच्या नेतृत्वाखाली एफसी गोवा चेन्नईयीनविरुद्ध भिडणार

Ranji Trophy Cricket: गोव्याच्या रणजी संघाची धुरा अभिनव तेजराणाकडे; शिवेंद्र भुजबळला पदार्पणाची संधी, ऋत्विकचे पुनरागमन

SCROLL FOR NEXT