Goa Video Dainik Gomantak
गोवा

Goa: मडगावातील पश्चिम बागलरस्ता स्टिल्टवर बांधण्यासाठी व्हिडिओ पाठवा

Goa: ज्यांनी या भागात पुराचा अनुभव घेतला आहे त्यांनी आपले अनुभव कथन करणारे व्हिडीओ पाठवावेत

दैनिक गोमन्तक

मडगाव: पुराचा धोका टाळण्यासाठी मडगावातून जाणारा पश्चिम बगल रस्ता सुरावली ते बाणावली या भागात स्टिल्ट (खांबा)वर बांधण्यासाठी ज्यांनी यापूर्वी या भागात पुराचा अनुभव घेतला आहे त्यांनी आपले अनुभव कथन करणारे व्हिडीओ पाठवावेत असे आता आवाहन करण्यात आले आहे. (Send video to build on West Bagal Road Stilt in Margao)

सदर भागात रस्ता मातीचा भराव घालून बांधावा की खांबावर पूल उभारून बांधावा याचा निर्णय घेण्यासाठी आठ वेगवेगळ्या प्राधिकरणाच्या तज्ञांची समिती नेमून निर्णय घ्यावा असा आदेश यापूर्वी राष्ट्रीय हरित लवादाने दिला होता.

या समितीला लोकांचं म्हणणे पटावे यासाठी आम्ही हा व्हिडीओ उपक्रम हाती घेतला असून लोकांनी आमच्या 94238 71526 या मदातवाहिनी क्रमांकावर ते अपलोड करावेत असे आवाहन या प्रकरणातील याचिकादार रॉयला फेर्नांडिस यांनी केले आहे.

फेर्नांडिस यांच्या दाव्याप्रमाणे सुरावली ते बाणावली या भागातून हा रस्ता जातो ते साळ नदीचे पाणलोट क्षेत्र असून जर तिथे मातीचा भराव घालून रस्ता उभारल्यास पाणी अडवून पूर येऊ शकतो तसेच या भागातील खारफुटीवरही त्याचा विपरीत परिणाम होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Health News: राणेंची गोमेकॉला मध्यरात्री भेट; अनेकांची उडाली झोप! आपत्कालीन सेवांचा घेतला आढावा

Panaji Traffic Congestion: कॅसिनो अन् बेशिस्त पार्किंगमुळे पणजीची कोंडी! गोवा खंडपीठाचे वाहतूक पोलिसांना महत्त्वाचे निर्देश

October Heatwave: 41.4 अंश तापमानाने म्हापसा तापला? शहरातील उष्णतेच्या नोंदींकडे सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याचा आरोप

October Temperature: पारा चढला, गोवा तापला! 37.2 अंश तापमानाची नोंद; उष्णतेमुळे यलो अलर्ट जारी

Cricket New Rules: क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! स्टंप्स उडाले तरी फलंदाज आउट होणार नाही, काय आहे नवा नियम? VIDEO

SCROLL FOR NEXT