Explosion of the gas cylinder
Explosion of the gas cylinderDainik Gomantak

Goa: मडगावात बंद घरात सिलिंडरचा स्फोट; 10 लाखांचे नुकसान

कोंब मडगाव (Madgaon) येथे एका बंद घरात ठेवलेल्या दोन गॅस सिलिंडरचा स्फोट (Explosion of the gas cylinder) झाल्याने सुमारे 10 लाखांचे नुकसान झाले.
Published on

मडगाव: कोंब मडगाव (Madgaon) येथे एका बंद घरात ठेवलेल्या दोन गॅस सिलिंडरचा स्फोट (Explosion of the gas cylinder) झाल्याने सुमारे 10 लाखांचे नुकसान झाले. घराचे बांधकाम चालू असल्यामुळे घरमालकाने आपले सर्व सामान एका खोलीत बंद करून ठेवले होते. त्याच खोलीत हा स्फोट झाला. जुल्स फेर्नांडिस (Jules Fernandes) यांच्या मालकीचे हे घर असून रात्री 8.30 च्या सुमारास हा स्फोट झाला. त्या बंद खोलीत एकूण पाच सिलिंडर होते त्यातील दोन सिलिंडर फुटले. या खोलीत जे किमती सामान ठेवले होते त्याचीही राख झाली.

Explosion of the gas cylinder
गोवा मुक्त होवून 60 वर्षे झाली; हणखणेतील गावकरी रस्त्याच्या प्रतिक्षेत

या घटनेची वर्दी अग्निशमन दलाला (Fire brigade) दिल्यानंतर त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या खोलीत असलेले आणखी तीन सिलिंडर त्यांनी बाहेर काढले. फेर्नांडिस यांनी आपले जुने घर मोडून दुसरे नवीन घर बांधण्याचे काम हाती घेतले होते. त्यासाठी घराच्या बाजूला एक खोली बांधून तिथे त्यांनी आपले सर्व सामान ठेवले होते. या खोलीत कुणी राहत नसल्याने कुठलीही जीवित हानी मात्र झाली नाही

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com