Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: वन्यजीवांबाबत युवा मुले जास्त संवेदनशील!

Goa News: वन्यजीव आपल्या समस्या इतरांना सांगू शकत नाही, त्यामुळे त्यांचा सांभाळ करणे सर्वांचे कर्तव्य आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: वन्यजीव आपल्या समस्या इतरांना सांगू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचा सांभाळ करणे सर्वांचे कर्तव्य आहे. अनेक नागरिक पाहिजे तिथे कचरा टाकतात.ते वन्यजीवांबाबत संवेदनशील नाहीत. परंतु युवापिढी ही पर्यावरण आणि वन्यजीवांबाबत संवेदनशील आहे, याचे समाधान वाटते, असे प्रतिपादन वन खात्याचे मुख्य प्रधान संरक्षक संतोष कुमार यांनी केले.

इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा सभागृहात आयोजित 71 व्या वन्यजीव सप्ताह समारोपात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. वनअधिकारी अमित खेमावत तसेच आनंद जाधव उपस्थित होते. संतोष कुमार पुढे म्हणाले, वन्यजीव सप्ताहात सहभागी झालेल्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच विजेत्या स्पर्धकांचे देखील अभिनंदन करतो.

आनंद जाधव म्हणाले, वन्यजीव सप्ताह साजरा करण्याचे उद्दिष्ट जनतेला आणि विद्यार्थ्यांना वन्यजीव संरक्षण आणि त्याचे महत्त्व याविषयी जागरुक करणे हे आहे. सप्ताहानिमित्त पहिल्यांदा बोंडला वन्यजीव अभयारण्यात फुलपाखरांचे सर्वेक्षण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच वन्यजीव गुन्हे नियंत्रणावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. ज्यात कस्टम पोलिस, वनाधिकारी तसेच वकील यांचा सहभाग होता.

चांगला प्रतिसाद

या उपक्रमात 20 प्राथमिक शाळा 39 उच्च माध्यमिक विद्यालये 5 विशेष दिव्यांग शाळा तसेच 5 महाविद्यालये एकूण 1637 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सप्ताहानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्‍नमंजुषा स्पर्धा आदींचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अमित खेमावत यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT