Goa Molestation Case Dainik Gomantak
गोवा

Goa Molestation Case: ‘त्‍या’ शिक्षकाने विद्यार्थिनीला दिली होती अपहरणाची धमकी, पोलिस जबानीत अनेक गोष्टी उघड

अनेक कारनामे : चार विद्यार्थिनींचा विनयभंग

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Molestation Case शाळेतील विद्यार्थिनींशी अश्‍‍लील चाळे केल्‍याच्‍या आरोपाखाली अटक करण्‍यात आलेला पीई शिक्षक रमेश गावकर याने एका विद्यार्थिनीला ‘माझे म्‍हणणे ऐकले नाहीस तर अपहरण करीन’, अशी धमकी दिली होती, अशी नवी माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.

या आंबटशौकीन शिक्षकाने चार विद्यार्थिनींचा हात लावून विनयभंग केला असल्‍याची शक्‍यता विद्यार्थिंनींनी दिलेल्‍या जबानीतून स्‍पष्‍ट झाली आहे.

या प्रकरणात रमेश गावकर याला कुंकळ्‍ळी पोलिसांनी अटक केली असून शारीरिक शिक्षण खात्‍याने त्‍याला दोन दिवसांपूर्वीच सेेवेतून निलंबित केले आहे.

या प्रकरणात आतापर्यंत दहा विद्यार्थिनींची जबानी नोंद करून घेतली असून त्‍यापैकी चौघीजणींनी त्‍या शिक्षकाने आपल्‍याला हात लावला, असे सांगितले आहे. अन्‍य विद्यार्थिनींनी हा शिक्षक आपल्‍याकडे वाईट नजरेने पाहायचा, अशी जबानी पोलिसांत दिली आहे.

सेवेतून बडतर्फ करा : आवदा व्‍हिएगस या प्रकरणात पोलिसांना मदत करणाऱ्या वन स्‍टॉप केंद्राच्‍या आवदा व्‍हिएगस यांनी, हा प्रकार गंभीर स्‍वरूपाचा असून अशा शिक्षकांना फक्‍त निलंबित करून चालणार नाही, तर त्‍यांना सेवेतून बडतर्फ करण्‍याची गरज आहे, असे सांगितले.

वास्‍तविक शिक्षण खात्‍याने शिक्षकांची नियुक्‍ती करताना त्‍यांची मानसिक चाचणी करून ते विद्यार्थ्यांना हाताळण्‍यास सक्षम आहेत का, याची पाहणी करणे गरजेचे असल्‍याचे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले. या प्रकरणात शिक्षण खात्‍याने गंभीरपणे लक्ष घालावे, अशी मागणीही त्‍यांनी केली आहे.

गरीब विद्यार्थिनी ‘लक्ष्य’

रमेश गावकर हा गरीब घरातील विद्यार्थिनींना हेरून त्‍यांना मदत करण्‍याचे आश्‍वासन द्यायचा. अशा तऱ्हेने तो विद्यार्थिनींचे लक्ष आपल्‍याकडे वळविण्‍याचा प्रयत्‍न करत होता. ‘माझे म्‍हणणे ऐकल्‍यास तुम्‍हाला चैनीच्‍या वस्‍तू घेऊन देऊ’, असेही त्‍याने काही विद्यार्थिनींना सांगितले होते, अशी माहिती प्राप्‍त झाली आहे. या प्रकरणात कुंकळ्‍ळी पोलिस सखोल चौकशी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pratiyuti Yog 2026: मेहनत करुन पदरी निराशा, लव्ह लाईफमध्ये दुरावा! जुलै महिन्यात ग्रहांचा महाभयंकर खेळ; 'डबल प्रतियुति योगा'मुळे 5 राशींवर ओढवणार संकट

Fake Call Centre Bust: हणजूण येथे बनावट कॉल सेंटरवर छापेमारी, क्राईम ब्रँचकडून 15 जणांना अटक; इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

IND vs ENG: इंग्रजांविरुद्ध भिडणार टीम इंडिया! टी-20 मध्ये भारताचा दबदबा की इंग्लंडची दादागिरी? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Sadetod Nayak: डाग नसलेले उमेदवार काँग्रेसने देणे गरजेचे, त्यांनी विश्वासार्हता गमावली; भाजप निश्चितपणे पुन्हा जिंकेल

SCROLL FOR NEXT