Goa School Reopening Dainik Gomantak
गोवा

Goa School Reopening: 'बॅक टू स्कूल' उद्यापासून राज्यातील शाळा सुरू; शालेय साहित्याच्या खरेदीची गजबजली बाजारपेठ

Goa School: सुटीनंतर पुन्हा शाळेची घंटा वाजायला दोन दिवस शिल्लक असल्याने सध्या सर्वत्र शालेय साहित्य खरेदी जोरात सुरू आहे. गेला आठवडाभर अवकाळी पावसाने कहर केल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी आहे.

Sameer Amunekar

डिचोली: सुटीनंतर पुन्हा शाळेची घंटा वाजायला दोन दिवस शिल्लक असल्याने सध्या सर्वत्र शालेय साहित्य खरेदी जोरात सुरू आहे. गेला आठवडाभर अवकाळी पावसाने कहर केल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी दिसून येत आहे.

पणजी, म्हापसा, फोंडा, मडगावसह तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू झाली आहे. काही ठिकाणी वह्या व इतर साहित्याची सवलतीत विक्री केली जात आहे. बॅगा, छत्री, रेनकोटचे दर मात्र थोडे वाढलेले आहेत. रंग, दर्जानुसारानुसार ग्राहकांना किंमत मोजावी लागत आहेत. एप्रिल महिन्यात नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले, पण शालेय साहित्याची खरेदी खूपच कमी प्रमाणात करण्यता आली. राहिलेली खरेदी आत्ता जोरात सुरू आहे.

यंदा आकर्षक रेनकोट आणि छत्र्यांसह शालेय साहित्य बाजारात विक्रीस उपलब्ध झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात शालेय साहित्याची खरेदी सुरू झाली असली, तरी मागील दोन दिवसांपासून खरेदीला जोर आल्याचे दिसून येत आहे.

५ ते १० टक्के दरात वाढ!

बॅग्स, छत्र्या, रेनकोट या वस्तूंमागे किंचित म्हणजे ५ ते १० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य पालकांच्या कपाळावर आट्या पडत आहेत. मुले तर आपल्या आवडीच्या वस्तूंसाठी हट्ट करताना दिसून येत आहेत.

मुलांच्या हट्टापायी पालकांनाही खिशाला कातर लावावी लागत आहे. आमच्या आस्थापनात शालेय साहित्य खरेदीवर सूट देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असे ‘वेन्सन’चे वाझ यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT