New Education Policy Goa
पणजी: राज्यातील शाळा एप्रिलपासून सुरू करण्याच्या निर्णयाला पालकांचा तीव्र विरोध होत असून शिक्षण संचालनालयाच्या या निर्णयाविरोधात सोमवारी शेकडो पालक एकत्र जमले आणि आपल्या हरकती व सूचना नोंदवल्या.
राज्यातील वाढती उष्णता, हवामान आणि शाळेतील मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे हा निर्णय अमान्य असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. शिक्षण संचालनालयाने आता या हरकती आणि सूचनांचा गांभीर्याने विचार करून पालकांच्या मागण्यांचा सन्मान करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
सिसिल रॉड्रिग्स यांनी सांगितले की, एप्रिलमध्ये शाळा सुरू होऊ नयेत यासाठी हजारो पालकांनी ई-मेल पाठवले आहेत. आम्ही ३०० स्वाक्षऱ्यांसह २५ पालकांनी २७ फेब्रुवारीला शिक्षण संचालकांना भेटून आमचा विरोध दर्शवला होता. आज आणखी पालक आणि पालक-शिक्षक संघाचे प्रतिनिधी शिक्षण संचालनालयाबाहेर आपल्या हरकती नोंदविण्यासाठी उपस्थित राहिले.
यावेळी सेबी मास्कारेन्हस यांनी मागील वर्षी उष्णतेमुळे विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याचे गोवा बोर्डानेच मान्य केल्याचे विधान सोमवारी अधोरेखित केले. गेल्यावर्षी जर ही परिस्थिती होती आणि ते गोवा बोर्डाने मान्य केले तर यावर्षीही तीच परिस्थिती आहे, हे गोवा बोर्डाने मान्य करावे.
सिसिल रॉड्रिग्स म्हणाल्या की, १३ मार्चला अधिकृत गॅझेट प्रसिद्ध झाले होते, त्यानंतर फक्त पाच दिवसांचा कालावधी हरकती नोंदवण्यासाठी दिला होता. यातही १४ ते १६ फेब्रुवारी सुट्टी असल्यामुळे पालकांना प्रतिक्रिया देण्यासाठी फार कमी वेळ मिळाला. तरीही
सोमवारी अखेरच्या दिवशी पालक एकत्र आले आणि त्यांनी आम्हाला एप्रिलमध्ये शाळा सुरू करण्यास आपल्या हरकती दिल्या.
टोनी कार्दोझो यांनीही सरकारी शाळांमध्ये पाणी आणि वीजपुरवठ्याच्या समस्यांकडे लक्ष वेधले. काही शाळांमध्ये पाणी नाही, वीज खंडित होते आणि जनरेटरची सोय नाही. अशा परिस्थितीत एप्रिलमध्ये शाळा सुरू केल्यास विद्यार्थ्यांचे हाल होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
१ पालकांनी ठाम भूमिका घेतली की, एका शाळेने एप्रिलमध्ये शाळा सुरू करायची असे ठरवले, तर त्याचा परिणाम उर्वरित ९९ टक्के शाळांवर होऊ नये. सोमवारी २०० हून अधिक पालकांनी एकत्र येऊन आपल्या हरकती नोंदवल्या. काही पालकांनी ई-मेलद्वारे हरकती पाठवल्या आहेत.
२ दरम्यान, एका शाळेमुळे सर्वांना त्रास देण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयाने घेतल्याने सिसिल रॉड्रिग्स यांनी हा शेवट नाही, तर सुरुवात आहे. निर्णय मागे घेतला गेला नाही, तर आम्ही आणखी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.