Goa Government School Dainik Gomantak
गोवा

राज्यातील प्राथमिक शाळांची स्थिती चिंताजनक; 52 टक्‍के सरकारी शाळांत दहापेक्षा कमी विद्यार्थी

धारबांदोड्यात सर्वाधिक शाळा : काणकोण, सांगेसह केपेतही चिंताजनक स्‍थिती

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Government School : प्राथमिक शाळांना दर्जेदार साधनसामग्री उपलब्‍ध करून देण्‍यात येत असल्‍याचे सरकारकडून सांगण्‍यात येत असले तरी शिक्षण खात्‍याने तयार केलेल्‍या सर्वेक्षणात राज्यातील ५२ टक्‍के सरकारी प्राथमिक शाळांत दहापेक्षा कमी विद्यार्थी शिकत असल्‍याचे दिसून आले आहे. परिणामी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात राज्यातील सहा प्राथमिक शाळा बंद करण्‍याची वेळ सरकारवर आली आहे. यंदात्‍यात आणखी भर पडण्‍याची शक्‍यता आहे.

शिक्षण खात्‍याने जो अहवाल तयार केला आहे, त्‍यानुसार राज्यातील ७१२ प्राथमिक शाळांपैकी ३७४ शाळांतून दहा किंवा त्‍यापेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहे. मागच्‍या वर्षी कमी पटसंख्‍येमुळे ज्‍या शाळा बंद केल्‍या, त्‍यात मराठी माध्‍यमांच्‍या चार, मराठी-कन्नड माध्‍यमांतील एक तर कोकणी-मराठी माध्‍यमातील एका शाळेचा समावेश आहे. काणकोण व बार्देश या तालुक्‍यांतील प्रत्‍येकी दोन तर सांगे व धारबांदोडा तालुक्‍यातील प्रत्‍येकी एक शाळा बंद करण्याची वेळ आली होती.

पालकांकडून खासगी शाळांना प्राधान्य

दहापेक्षा कमी विद्यार्थी असलेल्‍या शाळांची टक्‍केवारी तालुकानिहाय काढल्‍यास धारबांदोडा तालुक्‍यात हे प्रमाण सर्वाधिक म्‍हणजे ८४ टक्‍के आहे. त्‍यापाठोपाठ काणकोण, सांगे, केपे, पेडणे या तालुक्‍यांचा नंबर लागतो. दहापेक्षा कमी विद्यार्थी असणाऱ्या शाळांची या तालुक्‍यातील टक्‍केवारी ६८ ते ७२ टक्‍के यामध्‍ये येते. गोव्‍यातील २८७ खासगी प्राथमिक शाळांत ५२,१२० विद्यार्थी शिकत आहेत. त्‍याउलट ७१२ सरकारी प्राथमिक शाळांत २० हजारांपेक्षा कमी विद्यार्थी शिकत आहेत.

दहापेक्षा कमी विद्यार्थी असलेल्‍या शाळा

  • धारबांदोडा ४९ पैकी ४१

  • काणकोण ६३ पैकी ४३

  • सांगे ५२ पैकी ३४

  • केपे ५६ पैकी २४

  • पेडणे ६४ पैकी ४०

  • डिचोली ७३ पैकी ४०

  • सत्तरी १०१ पैकी ५२

  • फोंडा १०३ पैकी ५०

  • बार्देश ५७ पैकी २६

  • तिसवाडी ३३ पैकी ०९

  • सासष्‍टी ४१ पैकी ११

  • मुरगाव २० पैकी ०४

राज्यातील बहुतेक सरकारी शाळा एक किंवा दोन शिक्षकी आहेत. हे शिक्षक पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग घेतात. त्‍यामुळे सर्व विद्यार्थ्यांकडे पूर्णत: लक्ष देणे त्‍यांना कठीण होते. प्राथमिक शिक्षकांच्‍या बऱ्याच जागा सरकारने भरलेल्‍या नाहीत. या शाळांत पुरेशी साधनसामग्री नाही. त्यामुळे पालक मुलांना अशा शाळांमध्‍ये शिकायला पाठविण्‍यास तयार नसतात. त्‍यामुळेच ही पटसंख्‍या झपाट्याने उतरत आहे.

डॉ. संजय देसाई, शिक्षणतज्‍ज्ञ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ भक्कम स्थितीत! दररोज 84 विमानांची ये-जा, 13 हजार प्रवाशांची हाताळणी; विमानतळाला 137 कोटींचा नफा

Tarun Tejpal: कधी सत्ताकेंद्रांना प्रश्न, आता कारागृहाचे नियम! कोलवाळमध्ये तेजपालचा दिवस कसा जातो? शेजारी लुथरा बंधू आणि अजय गुप्ता

Passport New Rules: पासपोर्टचे नियम अन् फी बदलली, सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री; परदेश प्रवासापूर्वी ही बातमी नक्की वाचा

IND vs AFG: 18 चौकार, 22 षटकार अन् 229 धावा! अभिषेक शर्मा ठरला T20 मालिकेचा 'किंग'; टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडचा करिष्मा

खरी कुजबुज: भाजपचा शिस्तीचा बडगा कोसळला!

SCROLL FOR NEXT