Goa Education Dainik Gomantak
गोवा

Goa Schools Exams: शालेय परीक्षांबाबत मोठी अपडेट! 2 सत्रांमध्ये होणार आयोजन; प्रश्‍नपत्रिका, वेळापत्रक ‘जीएसईआरटी’द्वारे

Goa new education policy exam pattern: तिसरी आणि सहावीला शालेय अंतर्गत (इंटरनल) चाचणी ही प्रामुख्याने स्पर्धात्मक तसेच रूब्रिक पद्धतीचा वापर करत होणार आहे.

Sameer Panditrao

पणजी: नवीन शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने इयत्ता तिसरी पासून आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा या दोन सत्रांमध्ये आयोजित केल्या जाणार असून सत्रांत परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिका, वेळापत्रक या गोवा राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (जीएसईआरटी) द्वारे काढण्यात येणार आहेत.

प्रश्‍नपत्रिका जरी राज्यस्तरावर काढण्यात येणार असल्या आणि सर्वांच्या परीक्षा देखील एकाच वेळी होणार असल्या तरी उत्तर पत्रिका तपासणी तसेच गुणपत्रिका तयार करण्याची प्रक्रिया ही शालेय स्तरावर करण्यात येणार आहे. गुणपत्रिका कशा पद्धतीने करावी याची मार्गदर्शक सूचना जीएसईआरटी शाळांना करणार आहे.

या विषयांच्या प्रश्‍नपत्रिका

जीएसईआरटीद्वारे प्रमुख सैद्धांतिक विषय जसे की तीन भाषा, गणित, विज्ञान, समाज विज्ञान आणि वर्ल्ड अरांवड अस या विषयातील प्रश्‍नपत्रिका प्रामुख्याने एससीईआरटीद्वारे शाळांना पाठविण्यात येणार आहेत. त्यासोबतच कौशल्य आधारित विषय जसे शारीरिक शिक्षण, कला, व्होकेशनल व इतर विषयांच्या परीक्षा या प्रात्यक्षिक स्वरूपात होणार आहेत.

तिसरी आणि सहावीला शालेय अंतर्गत (इंटरनल) चाचणी ही प्रामुख्याने स्पर्धात्मक तसेच रूब्रिक पद्धतीचा वापर करत होणार आहे. प्रत्येक सत्रातील प्रत्येक विषयासाठी किमान शिक्षकांनी किमान चार उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांची चाचणी घेणे गरजेचे आहे. चार चाचण्यांमधील अभ्यासाचे धडे व उपक्रमाची पद्धती ही वेगवेगळी असणे गरजेचे आहे.

मेघना शेटगांवकर, संचालक, जीएससीईआरटी.

तिसरी ते आठवीपर्यंतचे सर्व सत्रांत परीक्षांच्या प्रश्‍नपत्रिका या एससीईआरटीद्वारे काढण्यात येतील. सर्व शाळांना जीएससीईआरटी प्रश्‍नपत्रिका पुरविणार आहेत. या आयोजनासाठी आवश्यक ती काळजी आणि तयारी करण्याचे काम सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मेष, कर्कसह 'या' 4 भाग्यवान राशींसाठी आजचा दिवस 'गोल्डन' ठरणार! अचानक धनलाभाचे योग आणि करिअरमध्ये प्रगती निश्चित

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

रामा काणकोणकर हल्ला प्रकरण; गुंड जेनिटोसह आठ जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT