Goa Education Dainik Gomantak
गोवा

Goa Education: नवीन शैक्षणिक वर्षाबाबतचे वेळापत्रक झाले अधिसूचित; काय आहेत महत्वाचे बदल? वाचा सविस्तर

Goa Education Policy 2025: गोवा शालेय शिक्षण कायदा, १९८४ च्या कलम २९ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून कायद्यात सुधारणा करण्यात येत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa School Education Amendment

पणजी: नवे शैक्षणिक वर्ष एप्रिलपासून सुरू होत आहे. त्‍या पार्श्वभूमीवर सरकारने गोवा शालेय शिक्षण नियम २०२५मध्ये सुधारणांचा मसुदा प्रकाशित केला आहे. त्‍या अनुषंगाने हरकती आणि सूचना नोंदवता येणार असून, त्‍यासाठी ५ दिवसांची मुदत देण्‍यात आली आहे.

गोवा शालेय शिक्षण कायदा, १९८४ च्या कलम २९ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून कायद्यात सुधारणा करण्यात येत आहेत. त्‍यासाठी सूचना विचारात घेण्‍यात येतील. जेणेकरून गोवा शालेय शिक्षण (सुधारणा) नियम, २०२५च्या अंतिम मसुद्यात याबाबत विचार करून बदल करता येतील, असे संचालनालयाने म्हटले आहे.

राज्यात पालक, शाळा व्यवस्थापने, शिक्षक संघटना तसेच काही शिक्षणतज्ज्ञ या नवीन शिक्षणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या बदलांविषयी आक्षेप घेत असून काहींनी न्यायालयात देखील याचिका दाखल केली आहे.

असे बदल होणार

इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता नववीचे शैक्षणिक वर्ष जूनपासून सुरू होईल आणि एप्रिलमध्ये संपेल.

इयत्ता सहावी ते दहावी आणि बारावीचे शैक्षणिक वर्ष एप्रिलमध्ये सुरू होईल आणि मार्चमध्ये संपेल.

परंतु या श्रेणीसाठी शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस आणि नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस एक आठवड्याची सुट्टी असेल.

शैक्षणिक वर्ष दोन सत्रांमध्ये विभागले जाईल.

सर्व शालेय वर्गांसाठी उन्हाळी सुट्टीचा कालावधी हा ५ आठवड्यांच्या असेल. तसेच दिवाळीनिमित्त ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात तीन आठवड्यांची सुट्टी देण्यात येईल.

श्री गणेश चतुर्थीत पाच ते सात दिवस सुट्टी जाहीर केली जाऊ शकते.

नाताळनिमित्त २४ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत सुटी असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT