Goa School Dainik Gomantak
गोवा

Goa School : चौथीची पुस्तके अजूनही पडूनच; तिसवाडीत शाळांकडून होतेय टाळाटाळ

शाळा सुरू होऊन आता महिना होत आला. तरीही अजून या शाळांनी पुस्तके नेलेली नाहीत.

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यातील प्राथमिक वर्गांची सर्व विषयांची पुस्तके 12 जूनपर्यंत वितरण केंद्रापर्यंत पोहोचली होती; परंतु तिसवाडीतील काही शाळा व्यवस्थापनांनी अद्याप प्राथमिक शाळांच्या पुस्तकांची वितरण केंद्रातून उचलच केली नाही. वितरण केंद्रात ठेवलेल्या पुस्तकांच्या गठ्ठ्यांवरून शाळा व्यवस्थापन पुस्तके नेण्यास का टाळाटाळ करते, हे मात्र न उलगडणारे कोडे आहे.

शाळा सुरू होऊन आता महिना होत आला. तरीही अजून या शाळांनी पुस्तके नेलेली नाहीत. शाळेत वेळेत पुस्तके पोहोचली नाहीत म्हणून अगोदरच शिक्षण खात्यावर खापर फुटलेले आहे. शिक्षण खात्याकडून पुस्तके वितरण केंद्रांवर पाठविल्यानंतर तेथून शाळांनी घेऊन जायची असतात; परंतु भाटले येथील पुस्तक वितरण केंद्रात अद्याप पुस्तके पडून आहेत. यामुळे शाळा व्यवस्थापनांकडून पुस्तके का नेली जात नाहीत, हा प्रश्‍न आहे.

दिरंगाई शाळांचीच

यावर्षी पुस्तक छपाईला विलंब होण्यास सरकारी पातळीवरील विविध कारणे कारणीभूत आहेत, तरीही शिक्षण संचालनालयाने होणारा विलंब आणि टीका पाहता पुस्तकांना फार काळ लागणार नाही, याची काळजी घेत जूनच्या मध्यापर्यंत सर्व शाळांमध्ये पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. तरी काही शाळा व्यवस्थापन आपले काम वेळेत करीत नसल्यामुळे ही पुस्तके अजूनही उचलली गेली नसावीत, असा प्राथमिक अंदाज बांधणे शक्य आहे.

संचालक म्हणतात...

याबाबत शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांच्याशी ‘दै. गोमन्तक’ने संपर्क साधला असता, त्यांनी पुस्तके मिळाली नाहीत अशाप्रकारची कोणाचीही तक्रार आलेली नाही. पुस्तके कोणत्या शाळांनी नेली नाहीत, हे आपण आता काही सांगू शकणार नाही किंवा शाळेत अगोदरची पुस्तकेही असू शकतात, त्यामुळे संबंधित शाळांनी आपला कोटा उचलला नसावा, असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT