Goa Monsoon 2023 : मडगाव, केपे परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद; तीन दिवस ऑरेंज अलर्ट

पावसाने ओलांडला एक हजार मि.मी.चा टप्पा!
Monsoon Update
Monsoon UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Monsoon Update : राज्यात उशिरा दाखल झालेल्या मॉन्सूनने गेल्या बारा दिवसात दमदार हजेरी लावली आहे. मडगाव व केप्यात तर पावसाने 1 हजार मि. मी.चा टप्पा ओलांडला असून सांगे आणि म्हापशामध्ये पाऊस हजार मि.मी.च्या जवळ पोचला आहे. या मुसळधार पावसाने शेतकरी वर्ग सुखावला असून पेरण्यांना गती आली आहे. तसेच धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे.

केरळमध्ये साधारणपणे १ जूनला दाखल होणारा पाऊस यंदा ८ जूनला आला आणि राज्यात तो ११ जूनला पोचला. मात्र, पुढे दहा दिवस पावसाने ओढ दिली. त्यामुळे राज्याच्या धरण साठ्यांमध्ये कमालीची घट होऊन अनेक ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्यानंतर २३ जूनपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.

केवळ दहा दिवसांत ७३ टक्के असलेली तूट आता १२.३ टक्क्यांवर आली आहे. ही तून येत्या चार दिवसांत भरून निघेल, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

Monsoon Update
Tomato Price Hike : टोमॅटो झाले लालेलाल; 120 रु. किलो तर पालेभाज्याही महागल्या

राज्यासह कोकण ते केरळ किनारपट्टीपर्यंत तयार झालेला कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवस गोव्यासह कोकण किनारपट्टी भागात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला असून पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

गेल्या २४ तासांत राज्यात एकूण १०७ मि.मी. पाऊस झाला असून आत्तापर्यंत राज्यात एकूण ९०१ मि.मी. म्हणजेच ३५.५० इंच पाऊस झाला आहे. राज्यात अजूनही सरासरी १२.३ टक्के पावसाची तूट आहे.

अरबी समुद्र, कोकण तसेच केरळ किनारपट्टीजवळ ताशी ५५ ते ६५ कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे.

Monsoon Update
एकाने माहिती मिळवायची, दुसऱ्याने टेहळणी करायची, तिसऱ्याने रेल्‍वेतून सोने लुटायचे; आंतरराज्‍य टोळी गजाआड

धरणांच्या पाणी साठ्यात वाढ

जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने ओढ दिल्याने धरणे कोरडी पडून पाणी टंचाई निर्माण झाली होती. परंतु गेल्या दहा दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे राज्यातील सर्व धरणांच्या पाणी साठ्यात चांगली वाढ झाली आहे.

अंजुणे ६%

साळावली ३१%

चापोली २१%

आमठाणे ५०%

गावणे ४३%

पंचवाडी २५%

गेल्या २४ तासांतील पाऊस (मि.मी.)

केपे १७०

मडगाव १६८.३

सांगे १५३

पेडणे १३०

पणजी १०४

फोंडा ९५

वाळपई ८८.३

दाबोळी ८४.८

साखळी ७६.६

मडगाव ४३.५५ इंच

केपे ३९.७९ इंच

सांगे ३८.६७ इंच

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com