School textbook shortage Dainik Gomantak
गोवा

School textbook shortage: नववीपासूनची पुस्तके अनुपलब्ध; विद्यार्थी, पालक चिंतेत; चौकशीसाठी दुकानांवर गर्दी

Goa school textbook shortage: नवीन शालेय वर्षाला १ एप्रिलपासून प्रारंभ झाला असून नववी व दहावी तसेच अकरावी व बारावी इयत्तेतील विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी पुस्तक दुकानांवर गर्दी करण्यास सुरवात केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

सासष्टी: नवीन शालेय वर्षाला १ एप्रिलपासून प्रारंभ झाला असून नववी व दहावी तसेच अकरावी व बारावी इयत्तेतील विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी पुस्तक दुकानांवर गर्दी करण्यास सुरवात केली आहे. पहिली ते आठवी इयत्तेपर्यंतची पुस्तके ‘एससीईआरटी’द्वारे प्रसिद्ध केली जातात व ती थेट शाळेतून विद्यार्थ्यांना दिली जातात. पण नववी ते बारावीची गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून प्रसिद्ध होणारी पुस्तके बाजारात उपलब्ध केली जातात. पण अनेक पुस्तके अनुपलब्ध आहेत, असे पालक व पुस्तक विक्रेते सांगतात.

जी पुस्तके अनुपलब्ध आहेत, त्यात नववीची मुव्हमेंट(सप्लिमेंटरी इंग्लिश), विज्ञान, गणित, हिंदी, कोकणी तसेच दहावीतील विज्ञान व मराठी, बारावीतील भौतिकशास्त्र १ व २, रसायनशास्त्र १ व २, गणित-१, हिंदी व कोकणी या पुस्तकांचा समावेश आहे. नववीतील विज्ञान व गणित पुस्तकांचा २०२४ चा साठा उपलब्ध होता, तो संपवण्यात आला.

वह्या विकत घेण्यासाठीही विद्यार्थी व पालकांची पुस्तक व स्टेशनरी दुकानांवर गर्दी होताना दिसत आहे. १०० पानी वही २२ ते२४ रुपये (एक नग), २०० पानी वही रु.३८ ते ४२ (एक नग), लांब ए४ १०० पानी रु.३० ते ३५ व २०० पानी रु.६०ते ७५ (एक नग) अशी बाजारात किंमत आहे.

हल्लीच जीएसटी नियमात बदल झाला, तेव्हा वह्यांवरील जीएसटी रद्द करण्यात आली. पण कागदावरील जीएसटी १२ वरुन १८ टक्क्यांवर आणण्यात आल्याने वह्यांच्या किंमतीत किंचीत वाढ झाल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. स्टेशनरी साहित्याच्या किंमतीत मात्र वाढ न झाल्याचे त्या विक्रेत्याने स्पष्ट केले.

पुढील आठवड्यात मिळणार...

ही सर्व पुस्तके दिल्लीतील होली फेथ इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड तर्फे छापून प्रसिद्ध केली जातात. कंपनीच्या म्हणण्यानुसार पुस्तके छापायची ऑर्डर मंडळाने उशिरा दिल्याने थोडा विलंब होईल. काही पुस्तके तांत्रिक कारणाने उपलब्ध झाली नाहीत. मात्र, या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सर्व पुस्तके उपलब्ध होतील, अशी माहिती शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘गोमन्तक''ला दिली.

शिकवायचे कसे?

काही वर्गात मुले व शिक्षकांकडे पुस्तकेच नाहीत, त्यामुळे काय शिकवायचे आणि कसे शिकवायचे? असा प्रश्‍न आहे. शाळा सुरू होऊन पाच दिवस झाले, तरीही अद्याप काही शाळांतून नव्या वर्षांत काहीच हालचाल झालेली नाही. काही शिक्षक दहावीचे पेपर तपासणीला गेलेत. त्यामुळे राहिलेल्या शिक्षकांवरच वर्गांची जबाबदारी आहे. वाढत्या उन्हाळ्यात पुस्तकाअभावी मुलांचा वेळ वाया जात आहे. फक्त दिवस भरतील पण अभ्यासाचे काय? हा प्रश्‍न कायम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ABVP: बिट्स पिलानीमधील आत्महत्यांची सीबीआयकडून चौकशी व्हावी; अभाविप, तर न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारणार

Goa Monsoon Preparations: डिचोली परिसरात मजुरांचा वाढलाय 'भाव'; पावसाळापूर्व कामांची गडबड, अवकाळी पावसामुळे कामात व्यत्यय

Goa Politics: फोंडा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार; भाटीकरांच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर लक्ष, इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता

Goa Weather: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीची हजेरी, पण गर्मीतून अद्याप सुटका नाही

Goa Infrastructure: डांबरीकरण खोळंबले, बेंजो वाजवून निषेध; मिशन फॉर लोकलतर्फे आंदोलन, आमदार प्रवीण आर्लेकरांवर टीका

SCROLL FOR NEXT