Goa School  Dainik Gomantak
गोवा

Goa School: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! 6 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु, परीक्षेच्या तारखाही ठरल्या; शिक्षण संचालनालयाचा नवा आदेश जारी

Goa School Academic Calendar : शिक्षण संचालनालयाने 2026-27 या शैक्षणिक वर्षाचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले.

Manish Jadhav

पणजी: शिक्षण संचालनालयाने 2026-27 या शैक्षणिक वर्षाचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकानुसार, राज्यातील शाळांना किमान 220 कामाचे दिवस आणि 200 अध्यापनाचे दिवस पाळणे बंधनकारक करण्यात आले.

शिक्षण विभागाने जारी केलेल्या या नवीन आदेशामुळे आगामी शैक्षणिक वर्षाचे नियोजन स्पष्ट झाले असून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना आतापासूनच आपल्या सुट्ट्यांचे आणि परीक्षांचे नियोजन करता येणार आहे. या शैक्षणिक वर्षात शाळांना एकूण 10 स्वेच्छाधीन सुट्ट्या घेण्याची मुभा देण्यात आली. यामध्ये विशेष म्हणजे गणेश चतुर्थीसाठी 16 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 या कालावधीत चार दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली.

नवीन वेळापत्रकानुसार, इयत्ता पहिली ते पाचवी आणि अकरावीचे वर्ग 6 जून 2026 पासून सुरु होतील. परीक्षेच्या वेळापत्रकाबाबतही शिक्षण विभागाने कडक निर्देश दिले आहेत. पहिल्या सत्राच्या परीक्षा 10 ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण कराव्या लागणार आहेत, तर दुसऱ्या सत्राच्या परीक्षा 13 मार्च 2027 पर्यंत संपवणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही शाळेला 31 मार्च 2027 पूर्वी वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर करता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

शिक्षण संचालनालयाने घेतलेला हा निर्णय शालेय कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. 220 दिवसांच्या कामाच्या मर्यादेमुळे अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल आणि विद्यार्थ्यांना (Students) पुरेसा वेळ मिळेल. तसेच, सणासुदीच्या सुट्ट्यांचे आधीच नियोजन केल्यामुळे पालकांची गैरसोय टळणार आहे. सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांना या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT