Goa School: गोवा शिक्षण खात्याचा अजब कारभार! सरकारी शाळा दिली कर्नाटकमधील मठाला, कातुर्ली-तुयेतील प्रकार

Goa School Karnataka Math: गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी अनेक गावांत वाड्यावाड्यांवर प्राथमिक शाळा सुरू करण्याचे धोरण अवलंबिले होते.
Goa schools given to Karnataka mathas
Goa schools given to Karnataka mathasDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: गोवा सरकारने पुरेशा विद्यार्थी संख्येअभावी बंद पडलेल्या सरकारी शाळांच्या इमारती स्थानिकांना थांगपत्ता लागू न देता गुपचूपपणे कर्नाटकातील मठांना देण्यास सुरुवात केल्याचे गुरुवारी उघडकीस आले.

पेडणे तालुक्यातील कातुर्ली-तुये येथील बंद असलेल्या सरकारी प्राथमिक विद्यालयाची इमारत गुरुवारी कुलूप काढून परप्रांतीयांच्या ताब्यात देण्याचा प्रकार काही नागरिकांना दिसून येताच त्यांनी अन्य नागरिकांशी संपर्क साधून याची कल्पना दिली. तेव्हा ताबा घेण्यासाठी आलेल्या त्या लोकांना विचारताच ‘हमे उपर से ऑर्डर मिली है’ असे सांगण्यात आले.

ही इमारत शिक्षण खात्याने कर्नाटक राज्यातील एका मठाला दिल्याची माहिती मिळाली. गोवा मुक्त होताच गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी अनेक गावांत वाड्यावाड्यांवर प्राथमिक शाळा सुरू करण्याचे धोरण अवलंबिले होते.

Goa schools given to Karnataka mathas
Goa School: गोव्यातील 50 सरकारी शाळा बंद! शिक्षकांच्‍या 347 जागा रिक्त; नागरिकांचे खासगी शाळांना प्राधान्य

अनेक जमीनदारांनीही कोणताही मोबदला न घेता आपल्या जमिनी देऊन सरकारच्या या शैक्षणिक विकास कार्यात सहकार्य केले. स्थानिक लोकांनी श्रमदान करून आपलाही वाटा उचलला. त्या मराठी शाळांच्या जमिनी आणि इमारती विद्यमान सरकार कर्नाटकातील लोकांना मठासाठी आंदण द्यायला निघाले आहे, याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

Goa schools given to Karnataka mathas
School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

निर्णय मागे घ्यावा!

तुये गावातील १४ लाख चौरस मीटर जमीन सरकारी आणि खासगी आस्थापनासाठी अधिग्रहीत आणि हस्तांतरित करण्यात आली आहे. यापुढे ग्रामस्थांना विश्वासात न घेता नवे प्रकल्प सुरू करू नयेत, असा ठराव संमत केला होता. त्याकडे लक्ष न देता सरकार शाळेची इमारत आणि त्यासाठी लोकांनी दिलेली जमीन परप्रांतीयांच्या मठाला कशी काय देत आहे, असा सवाल विचारला जात आहे. सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com