Goa scholarship for students with disabilities Dainik Gomantak
गोवा

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 'शिष्यवृत्ती' योजना, नववीपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत आर्थिक आधार; काय आहेत अटी?

Goa scholarship for students with disabilities: उच्च तंत्र तसेच व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी दिव्यांग खात्याने नवीन शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

Scholarship for Disabled Students : उच्च तंत्र तसेच व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी दिव्यांग खात्याने नवीन शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. याबाबतची अधिसूचना खात्याच्या संचालक वर्षा नाईक यांनी जारी केली आहे.

या अधिसूचनेनुसार, नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना दरमहा ९०० रुपये, बीए, बीकॉम व बीएससीच्या विद्यार्थ्यांना ११०० रुपये तर एमए, एमकॉम आणि एमएससीच्या विद्यार्थ्यांना दरमहा १३०० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आले आहेत. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दरमहा ३०० रुपये, बीए, बीकॉम, बीएससीच्या विद्यार्थ्यांना ५३० रुपये तर एमए, एमकॉम आणि एमएससीच्या विद्यार्थ्यांना ६०० रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.

तसेच वसतिगृहात राहणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना अतिरिक्त मदत देण्यात येईल. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दरमहा ४०० रुपये, बीए, बीकॉम, बीएससीच्या विद्यार्थ्यांना ५०० रुपये, तर एमए, एमकॉम आणि एमएससीच्या विद्यार्थ्यांना ४५० रुपये देण्यात येतील.

काय आहेत अटी?

या योजनेसाठी मान्यताप्राप्त शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठाचे नियमित विद्यार्थी असणे, किमान ४० टक्के अपंगत्व असणे, वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा जास्त नसणे, तसेच इतर कोणतीही शिष्यवृत्ती सुरू नसणे आवश्यक आहे. पात्र विद्यार्थ्यांकडे युडीआयडी कार्ड, आधारकार्ड आणि बँक पासबुक असणे बंधनकारक असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT