भास्कर नारुलकर
SC Constituency reservation : आम्ही आरक्षणाच्या विरोधात नाही पण, संपूर्ण गोव्यातून फक्त पेडणे हा एकच मतदारसंघ मागील ४६ वर्षे सलग आरक्षित का ? ४६ वर्षे पेडणेकरांवर हा सामाजिक अन्याय नव्हे का ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते भास्कर नारूलकर यांनी उपस्थित केला आहे.
नुकतेच राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, की आगामी काळातील गोवा विधानसभा निवडणुकीसाठी पाच ते सहा मतदासंघ आरक्षित ठेवावेत.
त्याच वेळी सरकार पेडणे मतदारसंघ ४६ वर्षापासून ‘एससी’ वर्गासाठी आरक्षित असून हे आरक्षण अन्य मतदारसंघात वर्ग करून न्यावे, असे कळवू शकले असते. पण तसे राज्य सरकारने केलेले दिसत नाही.
आजपर्यंत सत्तेवर असलेल्या सर्व राजकीय पक्षांनी आमच्या पेडणेच्या जनतेला गृहीत धरून राजकारण केले गेले, अशी टीका भास्कर नारूलकर यांनी केली.
४६ वर्षे पेडणे मतदारसंघ ज्या समाजासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे, त्या समाजाचा तरी विकास झाला आहे, का? याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असून कितपत विकास झाला, हा संशोधनाचा विषय आहे,असेही नारूलकर म्हणाले.
पेडणे मतदारसंघातील लोक विकास आणि हक्कांसाठी आक्रोश करत आहेत. मग सरकारने ४६ वर्षे एकच मतदारसंघ आरक्षित ठेवून काय लाभ झाला,असा सवालही नारूलकर यांनी केला आहे. येत्या अधिवेशनात या मतदारसंघाच्या आरक्षणाच्या सर्वच आमदारांनी मुद्द्यावर उहापोह करायला हवा,अशी अपेक्षा आहे,असेही नारूलकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.